आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनीप्रीतशी काँटॅक्टमध्ये आहेत या दोन व्यक्ती, लपूनछपून अशा बोलतात एकमेकांशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरार हनीप्रीतच्या शोधासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. - Divya Marathi
फरार हनीप्रीतच्या शोधासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
पंचकुला - स्पेशल सीबीआय कोर्टातून डेरा सच्चा सौदा प्रमुखाला बलात्काराच्या दोन प्रकरणांत दोषी ठरवल्यानंतर शहरात दंगा भडकला होता. दंगा घडवल्याप्रकरणी प्रमुख आरोपी आदित्य इंन्सां, हनीप्रीत आणि पवन इन्सां फरार आहेत. परंतु सध्या अटक झालेल्या 10 पैकी 4 जणांनी पोलिसांसमोर अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. चारही आरोपींनी एक गोष्ट मानली की हनीप्रीत, आदित्य आणि पवन इन्सां एकत्रद नाहीत पण एकमेकांच्या संपर्कात जरूर आहेत.
 
व्हॉट्सअॅप कॉलिंगने एकमेकांच्या टचमध्ये...
- पोलिसांनी त्यांच्या मोबाइलला इंटरसेप्ट करू नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉलिंगने ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. या तिघांकडेही राजस्थानचे नंबर असलेलेच मोबाइल आहेत.
- वास्तविक, हनीप्रीत, आदित्य आणि पवन यांचा शोधात दोन एसआयटी टीमनी नुकतीच गुरुग्राम, बिजनौरसह दोन इतर जागांवर रेड टाकली होती.
- यात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर पोलिसांची एक टीम राजस्थानात तळ ठोकून आहे. येथूनच त्यांना तिघांचीही इनपूट्स मिळाली आहे. 
 
अनेक नंबर ठेवलेत तिघांनी
- नुकत्याच पकडलेल्या चारही जणांनी पोलिसांसमोर अनेक खुलासे केले. त्यात फरार हनीप्रीत, आदित्य आणि पवन यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. यातून ते सिंपल कॉलिंग करत नाहीत.
- हे तिघे आपसात व्हॉट्सअॅप कॉलिंग करतात. हे तिघे एकत्र नाहीत, परंतु एकमेकांच्या पुरेपूर संपर्कात आहेत.
- लावदाजवळ अटक केलेल्या रोहताशने सांगितले की, तोही हनीप्रीतच्या संपर्कात होता. त्याला कळले होते की, ती राजस्थानात जाण्याचा प्लॅन करत होती. त्याच्या खबरीवरूनच पोलिस राजस्थानात गेले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...