आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतआधी ही होती बलात्कारी बाबाची खास, अशी बिघडली केमिस्ट्री, आता झाली गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनीप्रीतनंतर आता विपासनाही गायब झाली आहे. - Divya Marathi
हनीप्रीतनंतर आता विपासनाही गायब झाली आहे.
जयपूर - रोहतक तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या गुरमित राम रहीमचे जे कुणी 'खास' होते, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. या लिस्टमध्ये हनीप्रीत आणि विपासना इन्सां यांची नावे सर्वात अगोदर येतात. विपासना बाबा राम रहीमचा डेरा सांभाळते.
 
परंतु, काही दिवसांपासून पोलिसांचा तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. असे म्हटले जात आहे की, हनीप्रीतच्या आधी विपासना बाबाच्या खूप जवळ होती, परंतु हनीप्रीत येताच तिची बाबाशी केमिस्ट्री बिघडली. यानंतर राम रहीमने विपासनाला डेऱ्याचे दुसरे काम दिले.
 
दोघीही झाल्या गायब...
- विपासना आणि हनीप्रीतदरम्यान छत्तीसचा आकडा होता, असे सांगितले जात आहे. एकीकडे हनीप्रीतने स्वत: बाबाची वारसदार असल्याचे जाहीर केले होते. दुसरीकडे बलात्कारी बाबा तुरुंगात गेल्यानंतर विपासना म्हणू लागली की, हनीप्रीतचा डेऱ्याशी काडीचाही संबंध नाहीये, तिची कोणतीही हिस्सेदारी असूच शकत नाही. स्वत: विपासनालाही वाटायचे की, हनीप्रीतची डेऱ्यात काही ढवळाढवळ नसावी.
- या ओढाताणीत हनीप्रीत आणि विपासनाला शोधणे हे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
- लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतरही हनीप्रीतचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
पोलिसांना सापडत नाहीये विपासना...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागच्या 4 दिवसांपासून विपासना इन्सांबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नाहीये.
- पोलिसांना विपासनाची कोणतीही माहिती मिळत नाहीये. पोलिसांनी डेरा प्रशासन समितीच्या 45 लोकांची यादी बनवली होती. त्यांना चौकशीसाठी नोटीसही पाठवण्यात येणार होती. त्याआधीच विपासनाने लपाछपीचा खेळ सुरू केला.
- असे मानले जात आहे की, डेऱ्यात अशी काही रहस्ये दबलेली आहेत, जी विपासना बाहेर काढू शकते, परंतु हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा ती पोलिसांना सापडेल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...