आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमच्या खासमखास हनीप्रीतने तोडला जॅकी चेनचा रेकॉर्ड, असा असायचा सेटवर अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमच्या जट्टू इंजिनिअर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना सीन समजावताना हनीप्रीत. - Divya Marathi
राम रहीमच्या जट्टू इंजिनिअर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना सीन समजावताना हनीप्रीत.
चंदिगड/नवी दिल्ली - साध्वी बलात्कार प्रकरणात हरियाणाच्या सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम तुरुंगात पोहोचला आहे. बलात्कारी बाबासोबत त्याचे कुटुंबीयही चर्चेत आहेत. या सदस्यांपैकी राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सां सर्वात जास्त चर्चेत आहे. हनीप्रीतने 'हिंद का नापाक को जवाब' या मूव्हीमध्ये अॅक्टिंगही केलेली आहे.
 
बनवला हा रेकॉर्ड...
- 'हिंद का नापाक को जवाब' मूव्हीमध्ये हनीप्रीतने एक-दोन नव्हे तर चक्क 21 भूमिका केल्या होत्या. राम रहीमने दावा केला की असे करून तिने हॉलीवूड अॅक्टर जॅकी चेनचाही रेकॉर्ड तोडला.
- एवढेच नाही, बाबाची मानलेली मुलगी हनीप्रीत अॅक्टिंगसोबतच गाणे आणि फिल्म मेकिंगमध्येही खूप रस दाखवत होती.
- तिने राम रहीमच्या हकीकत प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या 'गुरुकुल ऑनलाइन' यासारख्या चित्रपटांचे सहदिग्दर्शनही केले आहे.
- हनीप्रीत इन्सां बाबा राम रहीमची खासमखास आहे. नेहमी त्याच्यासोबत नजरेस यायची.
- तथापि, राम रहीम जेलमध्ये जाताच हनीप्रीत गायब झाली आणि पोलिस तिच्या शोधात गुंतले आहेत. हनीप्रीतशिवाय राम रहीमची सर्वात मोठी मुलगी चरणप्रीतनेही त्याच्या अनेक चित्रपटांत काम केलेले आहे.
- प्रियंका ऊर्फ हनीप्रीतने राम रहीमच्या 'MSG-2: द मैसेंजर', 'MSG: द वॉरियर लायन हार्ट', 'हिंद का नापाक को जवाब: MSG लायन 2 हार्ट' आणि 'जट्टू इंजीनियर' इत्यादी सिनेमांत काम केलेले आहे.
 
#बंगाली फिल्म इंडस्ट्रीत जाण्याचा प्रयत्न
- राम रहीम आणि त्याची खास हनीप्रीत आपल्या हकिकत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरही चित्रपट बनवणार होते.
- या मूव्हीसाठी त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचे बजेट ठेवले होते. त्यांना यापासून 50 कोटी कमाईची अपेक्षाही होती.
- या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करणाऱ्या हनीप्रीतने एका बंगाली हिरोईनलाही मोठ्या रकमेवर साइन केले होते.
- तथापि, यादरम्यान बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्याने राम रहीमला 20 वर्षांसाठी तुरुंगात डांबण्यात आले, यामुळे आता तिच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान हनीप्रीतचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...