आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतचे मामा म्हणाले- बरे झाले अटक झाली, आता पूर्ण सत्य समोर येईल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी हनीप्रीतची कसून चौकशी केली. - Divya Marathi
पोलिसांनी हनीप्रीतची कसून चौकशी केली.
सिरसा/पानिपत - हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली, हे खूप चांगले झाले. जे काही झाले ते चांगलेच झाले. आता सर्व सत्य समोर येईल. हे म्हणणे आहे हनीप्रीतचे मामा अशोक बब्बर यांचे. साध्वी बलात्कारप्रकरणी तुरुंगवास झालेल्या बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीला मंगळवारी दुपारी 3 वाजता चंदिगडजवळ पोलिसांनी अटक केली अन् सिरसामध्ये राहणाऱ्या हनीप्रीतच्या मामांनी- अशोक बब्बर यांनी 'दैनिक भास्कर'शी थेट चर्चा केली.
 
हनीप्रीतला भाऊ आणि मामांनी दिला होता सल्ला...
- अशोक बब्बर यांना विचारण्यात आले की, हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली आहे, याबाबत तुम्ही काय म्हणाल?
- अशोक बब्बर म्हणाले, आज सकाळी 9 वाजता टीव्ही चॅनलमधून हनीप्रीतच्या बाबतीत बातमी आणि इंटरव्ह्यू पाहिला. तेव्हापासूनच वाटू लागले होते की, ती लवकरच हायकोर्टात सरेंडर करेल किंवा पोलिस तिला अटक करतील.
- शेवटी पंचकुला पोलिस टीमने हनीप्रीतला अटक केली. जे काही झाले ते चांगलेच झाले. आता पूर्ण सत्य समोर येईल.
 
मामा आणि चुलत भावाशी बोलत नाही हनीप्रीत...
- हनीप्रीतचे मामा अशोक बब्बर आणि चुलत भाऊ विजय तनेजा यांनी मागच्या आठवड्यात मीडियासमोर तिला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते.
- एवढेच नाही, डेराची चेअरपर्सन विपासना इन्सांनेही त्यांना कायद्याचा सन्मान करून सरेंडर करण्याचा सल्ला दिला होता.
- 39 दिवसांनी हनीप्रीतने सरेंडर करण्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली. परंतु, डेरा प्रवक्ता आदित्य इन्सां आणि इतर अजूनही फरार आहेत.
- हनीप्रीतचे मामा आणि चुलत भाऊव काका यांचे हनीप्रीतचे मागच्या काही वर्षांपासून बोलणे नाही तसेच त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणेही बंद आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हनीप्रीतची चौकशी करताना पोलिस...
बातम्या आणखी आहेत...