आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Husband Killed His Pregnant Wife Due To Doubt Of Character In Janjgir Chhattisgarh

सुटीवर घरी आला होता जवान, पत्नीचे 'सत्य' कळल्याने संतापून उचलले हे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जांजगीर - नुकतेच लग्नाला फक्त 3 महिने झालेल्या जवानाने पत्नीसह आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले होते. परंतु दोघांच्या पोस्टमॉर्टमनंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पीएम रिपोर्टमध्ये खुलासा झाला की, जवानाची पत्नी 3 महिन्यांची प्रेग्नंट होती. घटनेच्या दिवशीच मृत निकिताची तब्येत बिघडल्याने जवानाने तिला दवाखान्यात नेले होते. तेथे डॉक्टरांनी त्याला निकिताच्या पोटात 3 महिन्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते.
-यानंतर जवान आकाश सिंह मानसिकदृष्ट्या खचला. त्याचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते. नुकतीच एक आठवड्याआधीच तो सुटी घेऊन घरी आला होता आणि त्याची बायकोही तीन दिवसांपूर्वीच माहेरातून घरी आली होती.
 
दारू पिऊन बाइकवर फिरला गावात...
- गावकरी म्हणाले की, 17 तारखेला संध्याकाळी आकाशने दारूच्या नशेत बाइकवर रपेट मारली. 
- याच दिवशी त्याच्या पत्नीच्या प्रेग्नन्सीची रिपोर्ट आली होती. या बातमीमुळे त्याला धक्का बसला होता. यानंतर आकाशने टेलिफोन वायरने निकिताचा गळा दाबला आणि स्वत: रेल्वेखाली कटून जीव दिला.
 
मेमध्ये झाले होते लग्न
- पामगड परिसरात राहणारा 21 वर्षीय आकाश सिंह लष्करात गनर होता.
- जांजगीरच्या कसौदीमधील निकिता सिंहशी त्याचे लग्न 7 मे 2017 रोजी झाले होते.
- घटनेच्या तीन दिवस आधीच मृत निकिता आपल्या सासरी आली होती. आणि जवान सुटीवर घरी आला होता.
 
सोशल मीडियावरून पटली ओळख
- सकाळी 4 वाजता स्टेशन मास्तरांना रेल्वे ट्रॅकवर मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनेची माहिती लागलीच जीआरपीला दिली. तोपर्यंत मृताची ओळख पटली नव्हती.
- यानंतर व्हॉट्सअॅपवर मृताचा फोटो व्हायरल झाल्यावर त्याची ओळख पटली.
- जवानाच्या मृतदेह पंचनाम्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जवानाने लिहिलेली सुसाइड नोट आणि घटनेचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...