आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राँग नंबरमुळे जुळले होते या रिक्षावाल्याचे प्रेम, संशयाने केला Love Story चा शेवट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड - दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याने तिची हत्या केली. त्याने 10 महिन्यांच्या मुलीचाही गळा आवळून जीव घेतला. यानंतर तो पहिल्या बायकोला मारायला धावला. तिने पळून आपला जीव वाचवला आणि किंचाळून शेजाऱ्यांना गोळा केले. नवरा तिथून पसार झाला. त्याची डेडबॉडी सकाळी गावाजवळील एका झाडावर लटकलेली आढळली.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- रेंगालबहारी (रायपूर, छत्तीगड) गावात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. येथे राहणारा शिवकुमार चव्हाण ऑटोरिक्षा चालवून उपजीविका भागवायचा. 
- चार वर्षांपूर्वीपासून तो ऑटो चालवायचा. यादरम्यान एकदा त्याच्या मोबाइलवर एका राँग नंबरवरून फोन आला.
- राँग नंबरहून लक्ष्मी चव्हाणने त्याच्याशी बोलणे केले होते. नंतर दोघांत प्रेमप्रकरण सुरू झाले. शिवकुमार अगोदर विवाहित होता आणि त्याची बायको रायगडमध्ये राहायची.
- चार वर्षांपूर्वी त्याने लक्ष्मीलाही गावी आणले आणि दुसरी बायको म्हणून ती नांदायलाही लागली. त्याला लक्ष्मीपासून 10 महिन्यांपूर्वीच एक मुलगी झाली होती.
- मागच्या काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून लक्ष्मी आणि शिवकुमारदरम्यान वाद होऊ लागले होते. 
- मंगळवारी रात्री दोघांत पुन्हा वाद झाला आणि आरोपीने त्याची दुसरी पत्नी लक्ष्मी चव्हाण आणि 10 महिन्यांची चिमुकली खुशी यांची गळा दाबून हत्या केली.
- त्यांचे मृतदेह ऑटो टाकले. यानंतर पहिल्या बायकोलाही मारायला धावला, पण तिला जाग आली आणि तिने आरडाओरडा केला. लोक गोळा होऊ लागल्याने आरोपी घाबरला आणि घटनास्थळावरून फरार झाला.
- घटनेनंतर शेजाऱ्यांनी ऑटोमध्ये मायलेकीचा मृतदेह पाहिला, लगेच याची माहिती पोलिसांना दिली.
- पोलिस आरोपीचा शोध घेण्याआधीच गावाजवळील झाडाला शिवकुमारने फाशी घेतल्याची बातमी येऊन धडकली. पोलिस पोहोचले तोपर्यंत आरोपीने इहलोकीची यात्रा संपवलेली होती. पोलिसांनी आरोपी शिवकुमार चव्हाण, त्याची पत्नी लक्ष्मी चव्हाण आणि चिमुकली खुशी यांचे मृतदेह पंचनाम्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले.
- याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज आणि कशी घडली ही दुर्दैवी घटना...
बातम्या आणखी आहेत...