Home »National »Other State» Husband Killed Two Children And Wife, Absconding Dhanbad

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, रात्री पत्नी अन् 2 मुले झोपल्यावर घडले असे काही

त्याने आधी आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. छान बर्थडे केकही कापला मग...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 00:15 AM IST

  • आरोपी भैरवनाथने भावजयीशी लग्न करण्यासाठी स्वत:च्या 2 मुलांचा अन् पत्नीचा खून केला.
धनबाद (झारखंड) - त्याने आधी आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. छान बर्थडे केकही कापला. आणि त्याच रात्री दोन्ही लहान मुले आणि बायकोचा गळा चिरला. 3 तारखेला ही तिहेरी खुनाची घटना घडली. आरोपीने त्याच्या विधवा भावजयीशी लग्न करण्यासाठी हे कृत्य केले.
 
असे आहे प्रकरण
बडा जमुआ परिसरात मागच्या आठवड्यात झालेल्या ट्रिपल मर्डर केसमध्ये मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांनुसार, आरोपी भैरवनाथ त्याच्या चुलत भावजयीसोबत संबंध होते आणि तिच्याशी लग्नही करणार होता. 3 तारखेच्या रात्री आरोपीने स्वत:च्या दोन मुलांचा आणि बायकोचा खून केला आणि फरार झाला होता.
 
विधवा होती चुलत भावजयी...
- पोलिसांच्या मते, दोन वर्षांपूर्वी भैरवनाथचा एक चुलतभाऊ आजारानंतर वारला. यादरम्यान भैरवनाथची त्याच्या भावजयीशी जवळकी वाढली.
- महिलेने पोलिसांसमोर कबूल केले की भैरवनाथ तिच्याशी लग्न करू इच्छितो, परंतु ती तयार झाली नाही. आरोपीनेच तिला एक सिम खरेदी करून दिले होते, त्यावरच दोघांचे बोलणे सुरू असायचे.
 
मुलांचा गळा तर चिरलाच, अनेक हाडेही चिरली...
- 4 ऑक्टोबरच्या सकाळी आरोपीची पत्नी अनुपमा हिच्यासह तिच्या दोन मुलांचे (2 वर्षांचा अभय आणि 3 वर्षांची आभा) यांचे मृतदेह रूममघ्ये आढळले होते. 
- पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आरोपीने अनुपमाचा गळा पातळ तारेने आवळला होता, यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दोन मुलांचा गळा धारदार हत्याराने निर्घृणपणे चिरण्यात आला. यामुळे मुलांचा गळा तर चिरलाच, पण हाडेही चिरली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणखी फोटोज...

Next Article

Recommended