आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्री बायको 'राँग नंबर' निघाली, मग 11 वर्षांनी नवऱ्याने उचलले हे पाऊल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डान्सर शमा हिचा गळा दाबून आणि चाकूने भोसकून खून झाला. - Divya Marathi
डान्सर शमा हिचा गळा दाबून आणि चाकूने भोसकून खून झाला.
जालंधर - ज्या मुलीवर प्रेम होते तिच्याशीच लग्न करण्यासाठी आपल्या घरच्यांना खूप प्रयत्न करून राजी केले, पण मधुचंद्राच्या दिवशी त्याला बायकोबाबतचे "ते" कटुसत्य कळले. मग काय नवरदेवाने तत्काळ तिला सोडून दिले. परंतु याचा बदला म्हणून तब्बल 11 वर्षांनी त्याच्या या "बायको"ची हत्या केली. विवाहिता शमा हिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी नवरा नरेंद्र चौहान ऊर्फ हॅपीला अटक केली आहे.
 
त्याने 11 वर्षांनी घेतला बदला...
- डीसीपी गुरमित सिंग यांनी सांगितले की, 2 मे रोजी तेजमोहन नगरमध्ये महिलेचा खून झाला होता. महिलेचा गळा दाबून तिला चाकूनेही भोसकण्यात आले होते. शमाच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न 11 वर्षांपूर्वी नरेंद्रशी झाले होते.
- लग्नानंतर दोन दिवसांनीच त्यांच्या मुलीला नरेंद्रने घराबाहेर काढले होते. यानंतर ती माहेरीच राहू लागली होती. घर चालवण्यासाठी ती आर्केस्ट्रामध्ये काम करायची. काही दिवसांपूर्वी जावयाने मुलीला एकत्र राहण्यासाठी फोन केला. मुलीने मनाई केली. यावर दोन दिवसांनी पुन्हा त्याने फोन केला. यानंतर शमा नवऱ्याला भेटायला गेली. यानंतर मात्र ती बेपत्ताच झाली. 
- डीसीपी गुरमित सिंग म्हणाले, शमाच्या आईने जेव्हा नरेंद्र आणि शमाबद्दल त्याचा भाऊ छिंदाला विचारले, तेव्हा त्याने नरेंद्रचा नवा पत्ता दिला. तेथे पोहोचल्यावर घर बंद असल्याचे आढळले, पण घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. लोकांनी दरवाजा तोडला तर समोर त्यांच्या मुलीचा मृतदेह पडला होता. गळ्याला ओढणी लपटलेली होती आणि चाकूही लागलेला होता.
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, काय होते कारण अन् कसे झाले होते 'राँग नंबर'वर प्रेम...
बातम्या आणखी आहेत...