आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 कोटी खर्चून 20 वर्षांत ज्याला शोधू शकले नाही सरकार, या IPSने 20 मिनिटांत केला त्याचा खात्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरप्पनचा खात्मा करणारे आयपीएस के. विजय कुमार. - Divya Marathi
वीरप्पनचा खात्मा करणारे आयपीएस के. विजय कुमार.
नवी दिल्ली/मुंबई-  'चंदन तस्कर वीरप्पनला पकडत नाही तोपर्यंत मुंडण करणार नाही', अशी शपथ फायनल ऑपरेशन 'कोकून'चे नेतृत्व करणारे आयपीएस अधिकारी के. विजयकुमार यांनी घेतली होती. वीरप्पनचे एन्काउंटर करूनच आयपीएस विजयकुमार यांनी आपले वचन पूर्ण केले होते.  
 
IPS विजयकुमार
IPS विजयकुमार यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, वीरप्पनला पकडण्याची त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली होती. यासाठी विजयकुमार यांनी बन्नारी अम्मा मंदिरात एक नवस केला होता. वीरप्पनचा खात्मा करत नाही, तोपर्यंत मूंडण करणार नाही, विजयकुमार असा निर्धार केला होता.
- विजयकुमार वीरप्पनच्या शोधार्थ 1994 मध्ये पहिल्यांदा निघाले होते. पण त्यांना यश मिळाले नाही. 2001 मध्ये पुन्हा सहा महिन्यांसाठी ते दुसर्‍यांदा निघाले होते.
- मिशनच्या यशस्वीतेसाठी विजयकुमार यांनी मंदिरात पूजा केली होती.
- वीरप्पनचा अनेक वर्षांपासून शोध घेतला जात होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
 
पुढील स्लाइडवर वाचा, असा केला वीरप्पनचा एन्काउंटर... विजयकुमार यांनी बन्नारी अम्मा मंदिरात जाऊन केले होते मूंडण...
बातम्या आणखी आहेत...