आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अय्यर मुद्दाम मोदींच्या जातीवर बोलले, मग माफी मागितली; पक्षातून निलंबन हा दिखावा : जेटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना नीच म्हटल्यानंतर राजकारणात चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणात आता अर्थमंत्री अरुण जेटली म्ङणाले की, अय्यर यांचे पक्षातून निलंबन हे ठरवून केलेले राजकारण आहे. लोकांनी काँग्रेसचा हा खेळ लक्षात घ्यावा अशी माझी विनंती आहे. गुरुवारी अय्यर मोदींना नीच म्हणाले होते. मोदींनी सूरतच्या सभेच त्याचे उत्तर देत म्हटले होते की, नीच जातीचा अशलो तरी, माझे संस्कार चांगले आहेत.


अय्यर यांनी मुद्दाम केले वक्व्य.. 
- न्यूज एजन्सीच्या मते जेटली म्हणाले, अय्यर यांनी मुद्दाम मोदींसाठी जातीवाचक वक्तव्य केले. नंतर संधी पाहून माफी मागितली. त्यांचे पक्षातून निलंबन करणे हेही राजकारण आहे. 
- अय्यर यांच्या वक्तव्यावरून त्यांचा हा माइंडसेट दिसतो की, फक्त एखाद्या विशिष्ट कुळातील व्यक्तीलाच या देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे.  परिवार ही इस देश पर शासन कर सकता है।''
- काँग्रेसने पंतप्रधानांना नीच म्हणत, देशातील दुबळ्या आणि मागासवर्गातील लोकांचा अपमान केला आहे. 
- भारताची खरी शक्ती तेव्हाच दिसेल जेव्हा, एखाद्या सामान्य वर्गातून आलेला व्यक्ती घराणेशाहीचे राजकारण संपवले. 


काय म्हणाले अय्यर.. 
2014 निवडणुकांपूर्वी मोदींना चायवाला म्हणणाऱ्या अय्यर यांनी गुरुवारी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, आंबेडकरांचे जे सर्वात मोठे स्वप्न होते ते साकार करण्यात नेहरूंचा सर्वाधिक वाटा होता. आता आंबेडकरांच्या स्मृतीत तयार करण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनावेळी या कुटुंबाबाबत असे बोलले जाते. मला वाटते हा व्यक्ती अत्यंत -- आहे. याच्यात सभ्यता नाही. यावेळी अशा घाणेरड्या राजकारणाची गरज काय. 


मोदींनी काय दिले उत्तर.. 
- सभेत मोदी म्हणाले, एक नेते आहेत, मोठ मोठ्या डिग्री घेतल्या आहेत, भारताचे राजदूत आहेत, मनमोहन यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी आज एक वक्तव्य केले. म्हणाले, मोदी नीच जातीचा आहे. मोदी नीच आहे. हा गुजरातचा अपमान आहे. ही भारताची परंपरा आहे का? 
- हा जातीवाद नाही का? हा देशातील दलितांचा अपमान नाही का? ही मोगलांचा मानसिकता नाही का? त्यांनी नीच म्हटले तरी आपले संस्कार याची परवानगी देत नाहीत. मतदानातून त्यांना सांगा नीचचा अर्थ काय होतो. तुम्ही मला नीच म्हटले तरी, मी लोकांच्या सेवेसाठी आलो आहे. गांधीजींनी हेच केले होते. 
- तुम्ही ज्यांना नीच म्हणता त्यांनी तुम्हाला धडा शिकवला आहे, भविष्यातही शिकवतील. तयार राहा. 

 

पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्सद्वारे जाणून घ्या, राजकारणात यापूर्वी अय्यर यांच्या वक्तव्याचा आणि नीच शब्दाचा यापूर्वी कसा परिणाम झाला होता..

 

बातम्या आणखी आहेत...