आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

250 कोटींच्या बंगल्यात राहते राधे माँ, आतून असा आहे नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बंगल्यात राधे माँ. उजवीकडे राधे माँचा 250 कोटींचा बंगला. - Divya Marathi
आपल्या बंगल्यात राधे माँ. उजवीकडे राधे माँचा 250 कोटींचा बंगला.
नवी दिल्ली/पंजाब - आखाडा परिषदेने 14 भोंदूबाबांची यादी जारी केली. या यादीतील स्वत:ला देवीचा अवतार सांगणाऱ्या सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ विविध कारणांने वादग्रस्त ठरलेली आहे. जगाला मोह-मायेपासून दूर राहण्याचा उपदेश देणारी ही राधे स्वत: मात्र लक्झरी लाइफ जगते. आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तिच्या बंगल्याचे इनसाइड फोटोज. सोबतच राधे माँला  लाल रंगाचे एवढे आकर्षण का आहे, हेही जाणून घ्या.
 
250 कोटी रुपयांच्या बंगल्यात राहते राधे माँ...
- राधे माँ, मुंबईच्या चिकूवाडीमधील नंद नंदन भवन नावाच्या आलिशान बंगल्यात राहते.
- महागड्या मार्बल्सची फ्लोरिंग असलेल्या या बंगल्याची किंमत तब्बल 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
- ज्या खोलीत राधे माँ आपल्या भक्तांना भेटते, तिथे मखमली बेड, एसी, फॅन्सी लायटिंगसहित तमाम सुखसुविधा आहेत.
- भक्तांना ही राधे माँ एका खास खोलीत भेटते, ज्यात बेडशीटपासून ते पडद्यांपर्यंत सर्वकाही लालेलाल असते.
- या खोलीतील राधे माँच्या आसनाच्या ठीक वर दुर्गादेवीची मूर्तीही आहे.
- राधे माँनुसार, ती आपल्या भक्तांच्या घरी राहते, परंतु मीडिया रिपोर्टसनुसार, तिच्याकडे तब्बल 1 हजार कोटींची प्रापर्टी असल्याचा आरोप आहे.
 
बंगल्यात अवैध बांधकामाचाही आरोप
- 500 चौ.मी. मध्ये असलेला हा बंगला राधे माँचा मुलगा हरजिंदर मोहनसिंग याच्या नावे आहे. ज्याला 2009 मध्ये विकत घेतलेल्या प्लॉटवर बांधण्यात आले होते.
- रमेश जोशी नावाचे तक्रारकर्ते म्हणाले की, बंगल्याच्या बांधकामात मनपाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. अनधिकृत पद्धतीने हे बांधकाम केले आहे.
- त्यांनी असाही आरोप केला की, अधिकृतरीत्या या प्लॉट खरेदीसाठी फक्त 1 कोटी 65 लाख रुपये दिल्याचे दाखवले असले तरी वास्तविक यासाठी तब्बल 30 कोटींचा खर्च करण्यात आला होता.
 
असा आहे गाड्यांचा आलिशान ताफा
- राधे माँकडे मर्सिडीझ, होंडा सिटी, फॉर्च्युनर, जॅग्वारसह अनेक लक्झरी कार आहेत. असे सांगितले जात आहे की, भक्तांचे येणे-जाणे बंद झाल्यावर राधे माँच्या या कार आता तिच्या सत्संग एरियामध्ये पार्क केल्या जातात.
- राधे माँच्या सर्व गाड्यांमध्ये लाल रंगाची सीट, लाल रंगाचे टायर कव्हर, एवढेच नव्हे गाड्यांचे इंटेरिअरही लाल रंगाचे आहे. 
 
कोण आहे राधे माँ?
- राधे माँचा जन्म पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात एका शीख कुटुंबात झाला होता.
- तिचे लग्न पंजाबच्याच राहणाऱ्या एका व्यापाऱ्याशी - सरदार मोहनसिंगशी झाले आहे.
- लग्नानंतर एका महंताची राधे माँशी भेट झाली. त्यानंतर तिने आध्यात्मिक जीवन स्वीकारले.
- काही काळानंतर ती मुंबईत आली आणि राधे माँ या नावाने प्रसिद्ध झाली.
- राधे माँच्या विरुद्ध मुंबई, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये वेगवेगळ्या केसेस दाखल झालेल्या आहेत. हुंडाप्रकरणी मुंबई पोलिसांनीही तिची चौकशी केली आहे. तथापि, तमाम आरोपांचे राधे माँने खंडन केले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राधे माँच्या लाइफस्टाइलशी निगडित काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...