आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉन्ग नंबरवर बोलताना जडले युवकावर प्रेम, नंतर तरूणीने नवऱ्यासोबत केले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो केवळ बातमी प्रेझेंटेशनसाठी वापरलेला आहे. - Divya Marathi
फोटो केवळ बातमी प्रेझेंटेशनसाठी वापरलेला आहे.

पलामू (झारखंड)- मेदिनीनगर येथे 11 नोव्हेंबरला एका युवकाची हत्या झाली होती, याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रयकरला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे अनैतिक प्रेम प्रकरण समोर आले आहे. एक रॉन्ग नंबरवर बोलताना आरोपी महिलेला कॉल करणाऱ्यावर प्रेम झाले. यानंतर लग्न करण्यासाठी दोघांनी मिळून या हत्येचा कट रचला आणि युवकीची हत्या केली. पोलिसांनी महिलेचा कॉल डिटेक्ट केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.


एसपीने दिली अशी माहिती....
- यासंबंधी बोलातना एसपी इंद्रजीत महथा यांनी सांगितले की, फिरोज आलम या युकाची हत्या त्याची पत्नी जिया परवीन आणि तिच्या प्रियकर विद्याभास्कर तिवारी यांनी घडवून आणली.
- 11 नोव्हेंबरच्या रात्री घरात घुसून फिरोज आलम याची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली होती. या प्रकणात पोलिसांना सुरूवातीपासूनच त्याची पत्नी जियावर संशय होता.
- पोलिसांनी चौकशीदरम्यान तात्रिक शाखेच्या मदतीने जियाचे कॉल डिटेल काढले. यात जिया एका महिन्यात विद्याभास्करशी 171 वेळा कॉलवर बोलली असल्याचे समोर आले. 
- पोलिसांनी या दिशेने तपास सूरू केला तेव्हा या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी जियाला अटक करून तिची सक्तीने विचारपूस केली.
- जियाने सांगितले की विद्याभास्करशी ती अनेकवेळा फोनवर बोलत होती. दोघे अनेकवेळा बेतला येथे फिरायला देखील गेले होते.
- जियाने सांगिलेकी विद्याभास्करशी तिला लग्न करायचे होते, त्यामुळे कट रचून दोघांनी मिळून पती फिरोज आलमची हत्या केली.
- एसपींनी सांगितले की, दोघांच्या संबंधामुळे फिरोज आलम जियावर रागवत होता. विद्याभास्करसोबत शेखर तिवारी नावाचा व्यक्तीचा देखील या हत्येत सहभाग आहे.


जियानेच उघडला घराचा दरवाजा...
- एसपी इंद्रजीत महथा यांनी सांगितले की, घटनेच्या रात्री घराचा दरवाजा जिया परवीननेच उघडला होता. याचा खुलासा पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर केलेल्या घराच्या तपासातच झाला होता.
- त्यांनी सांगितले की, जियाला दोन वर्षांपूर्वी रॉन्ग नंबरवरून कॉल आला होता. या कॉल वरून विद्याभास्कर आणि तिची मैत्री झाली. तिचे पूढे प्रेमात रूपांतर झाले. परंतु, यामुळे जियाचा पती फिरोजला आपला जिव गमवावा लागला.
 

फोटो : अनिल कुमार
पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधित PHOTO...

बातम्या आणखी आहेत...