आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने ज्याच्यासाठी सोडले घर त्याने केले मित्राच्या हवाली, मग झाला सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणीने पोलिसांत सामूहिक बलात्काराची तक्रार दिली. - Divya Marathi
तरुणीने पोलिसांत सामूहिक बलात्काराची तक्रार दिली.
ग्वाल्हेर - एका तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने लग्नाच्या आमिषाने आग्रामध्ये फिरवले. 10 दिवसांनी तिला ग्वाल्हेरात आणून मित्राच्या भावजीच्या घरी ठेवले. येथे या भावजीने त्याच्या मित्रासह तिच्यावर गॅंगरेप केला. एवढेच नाही बॉयफ्रेंडच्या मित्रानेही मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर रेप केला. यानंतर सर्वजण मुलीला घराजवळ सोडून फरार झाले. मग मुलीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
 
असे आहे प्रकरण...
- इंदरगंज परिसरात राहणाऱ्या मुलीची मैत्री सौरभ राठोड नावाच्या मुलाशी झाली. मागच्या महिन्यात 25 ऑगस्टला सौरभने मुलीला घरून पळून जाऊन लग्न करण्यासाठी राजी केले.
- तरुणीही तयार झाली आणि घरातून सौरभसह गायब झाली. सौरभ तिला घेऊन आग्रामध्ये राहिला. 6 सप्टेंबरला सौरभ मुलीला घेऊन ग्वाल्हेरला आला आणि त्यानंतर लग्न करू असे म्हणाला.
 
ज्याच्या घरी थांबली त्यानेच केला रेप
- ग्वाल्हेरच्या स्टेशनवर सौरभने त्याचा मित्र रोहित चौहानकडे तरुणीला सुपूर्द केले. रोहितनेही तरुणीला लग्नाची ऑफर दिली. यानंतर रोहित तरुणीला घेऊन त्याच्या भावजीच्या- प्रमोद यादवच्या घरी गेला.
- येथे तरुणी प्रमोद यादवच्या किरायाच्या घरात राहिली. यानंतर प्रमोद आणि त्याचा मित्र बंटी यादव यांनी तिच्यावर रेप केला. रोहितनेही तरुणीवर बळजबरी केली.
 
जिवे मारण्याची दिली धमकी
- यानंतर रोहित आणि त्याच्या मित्रांनी जिवे मारण्याची धमकी देऊन तिला तिच्या घराजवळ सोडले आणि फरार झाले. रेपची शिकार झालेल्या तरुणीने पूर्ण घटना सांगितली.
- यानंतर कुटुंबीय तरुणीला घेऊन पोलिसांत गेले. गँगरेपची बातमी अॅडिशनल एसपी दिनेश कौशल यांना कळताच तेही तेथे आले.
- यानंतर तरुणीचे मेडिकल करण्यात आले, यात तिच्यावर बळजबरी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दाखल केले आहे.
- अॅडिशनल एसपी दिनेश कौशल म्हणाले, सध्या एका आरोपीला पकडण्यात आले आहे. तिघांचा शोध सुरू आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पॉस्को अॅक्टअंतर्गत प्रकरण दाखल केले आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...