आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 हजार होती पत्नी परत मिळण्याची किंमत; धाडसी पतीने अशी केली तिची रेडलाइट एरियातून सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - यूपीच्या आग्रामध्ये पतीच्या धाडसामुळे एका महिलेचे आयुष्य रेडलाइट एरियात बरबाद होण्यापासून वाचले. परंतु पुढच्या कारवाईसाठी त्याला दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी त्याला पोलिसांत खेटा माराव्या लागत आहेत. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी सिनेस्टाइल ही घटना, पण समाजातील दाहक प्रश्नांची जाणीव देऊन गेली. 
 
असे आहे प्रकरण...
- सिकंदरा परिसरातील अजय (बदललेले नाव) याची पत्नी मोहिनी (बदललेले नाव) गत 24 सप्टेंबरला भावाला भेटायला माहेरी फिरोजाबादला गेली होती.
- 26 सप्टेंबरला परत येताना वाटेत इटावा बाबरपूर येथील संजय रवी आणि फिरोजाबादच्या प्रीतीने तिला गुंगीचे औषध खाऊ घालून बेशुद्ध केले आणि आग्र्याच्या रेडलाइट एरियात एका कुंटणखान्यावर विकले.
- मोहिनीवर दबाव आणण्यासाठी त्यांनी तिच्या मुलाचेही अपहरण केले.
- पत्नी घरी न परतल्याने जेव्हा पती अजयने तिचा शोध सुरू केला, तेव्हा त्याला रेडलाइट एरियाची बाब कळली.
- अजय म्हणाला, मी मदत मागण्यासाठी पोलिसांत गेलो होतो. तेथे तक्रार ऐकल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये पाठवले, तिथे मला कुणीही मदत केली नाही.
- मी त्रस्त होऊन हिंदू जागरण मंचाचे अविनाश राणा यांच्याशी संपर्क केला, त्यांनी लगेच एसपी सिटी कुंवर अनुपम सिंह यांना फोन केला. एसपींनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून मला समजावले आणि संबंधित पोलिस स्टेशनला आदेश दिले. यानंतर काही वेळातच माझ्या पत्नीला त्या नरकातून सोडवण्यात आले.

छाप्या मारण्याआधीच अलर्ट झाले होते कोठेवाले
- 15 दिवसांपूर्वी छत्ता पोलिसांनी या रेडलाइट एरियात छापा मारून एक तरुणी आणि इतर दोघांना अटक केली होती. पकडण्यात आलेल्या तरुणीद्वारे बळजबरी विक्री केल्याच्या आरोपानंतर तिघांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता.
- छत्ताचे पोलिस स्टेशन इंचार्ज संजय जायसवाल यांनी कबूल केले की, त्या एरियात रेड टाकण्याआधीच बातमी लीक झाली होती. यामुळे ते लोक अलर्ट झाले होते.
- रेडनंतर लगेच पोलिसांनी पाठ वळवताच त्या कोठ्यावर पहिल्यासारखे वातावरण दिसले. याप्रकरणी हिंदू संघटनांनी हंगामाही केला.
- पोलिसांच्या मते, त्यांनी पीडितेच्या तक्रारीवरून छापा टाकून एका महिलेला मुक्त केले आहे. तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे.
 
नोट: फोटाेंचा वापर न्यूज रिप्रेझेंटेशन करण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कसा एका पतीने पत्नीला वाचवण्यासाठी 80 हजारांचा सौदा केला....
बातम्या आणखी आहेत...