आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्यांचा संसार, भावजयीला एकटी पाहून दिराची नियत बिघडली अन् केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिराच्या बळजबरीला भावजयीने विरोध केल्याने त्याने तिचा खून केला. - Divya Marathi
दिराच्या बळजबरीला भावजयीने विरोध केल्याने त्याने तिचा खून केला.
नवगछिया (भागलपूर) - सख्ख्या दिराने आपल्या भावजयीवर बळजबरी केली. पीडितेने याचा विरोध केल्यावर त्याने देशी पिस्तुलातून महिलेला जबड्याजवळ गोळी मारली. कुटुंबीयांनी उपचारांसाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्रकृत आणखी ढासळल्याने तिला मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. 
 
घरात एकटेचे होते दीर-भावजयी...
- घटनेनंतर डीएसपी मुकुल कुमार रंजन, पोलिस स्टेशन अध्यक्ष संजय कुमार सुधांशु व इतर घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी दिराला अटक केली.
- दरम्यान, पोलिसांनी खुनात वापरलेला देशी पिस्तूल शोधून हस्तगत केले. घराची तपासणी करताना पोलिसांना आणखी दोन देशी पिस्तुले, काडतुसांसह आढळली.
- मृत महिलेच्या सासऱ्यालाही  ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. डीएसपी म्हणाले, आरोपी दिराने गुन्हा कबूल केला आहे.

चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
- मृत पूनमचे लग्न चार महिन्यांपूर्वीच झाले होते. तिचा पती एका हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी लॅब चालवतो.
- घटनेच्या वेळी तो आपल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये होता. माहिती मिळताच घरी गेल्यावर त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर त्याने लगेच उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल केले.
- अटक झालेला दीर कृष्णा फार्मासिस्टचे शिक्षण घेतोय. तो नवरात्रीनिमित्त घरी आला होता. 
 
घटनेच्या वेळी दोघेच होते घरात
- ज्या वेळी हा खून झाला, तेव्हा पूनम आणि तिचा दीर कृष्णा हे दोघेच घरात होते. दसऱ्यामध्ये पूनमचा भाऊ 12 वर्षीय रौनक कुमार बहिणीसह आलेला होता.
- रौनकने सांगितले की, घराच्या एका खोलीत माझी बहीण झोपलेली होती. दुसऱ्या खोलीत कृष्णा झोपलेला होता. मी आणि भावजीची बहीण मधू जुन्या घरात टीव्ही पाहत होतो.
- दुपारी दोन वाजता कृष्णाने पिस्तूल झाडली. यानंतर पूनमला दवाखान्यात नेण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...