जमशेदपूर - येथे एका विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. महिलेच्या माहेरच्यांनी हा खून असल्याचे सांगितले. विवाहितेचे वडील म्हणाले, एका महिन्यापूर्वी मुलीने पत्र लिहिले होते, यात तिच्या नवऱ्याने केलेल्या छळाची खडानखडा माहिती होती. पत्रात लिहिले होते की, नवरा तिला रात्रीच्या वेळी बळजबरी दारू आणि सिगारेट पाजतो. एवढेच नाही, तोंडावर चिकटपट्टी लावून प्रचंड मारहाण करतो.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- दुसरीकडे, मृत महिलेचा पती म्हणाला की, माझ्या पत्नीला फिट्स यायचे. घटनेच्या रात्री प्रीती खोलीत टीव्ही पाहत होती. यादरम्यान तिला फिट्सचा झटका आला आणि ती खाली पडून तिच्या डोक्याला जखम झाली. तिला घेऊन आम्ही रुग्णालयात गेलो, पण डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
- तथापि, माहेरची माणसे म्हणतात की, तिचा पती आणि सासूनेच मिळून तिचा खून केला आहे.
चिठ्ठीत लिहिले होते दु:ख
- वडील जितेंद्र सिंह म्हणाले, मुलगी प्रीतीचे 2008 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसांनीच जावई आणि त्याच्या आईने (माया देवी) तिचा छळ करायला सुरुवात केली.
- प्रीतीने आम्हाला एक पत्र पाठवले, ज्यात तिने तिचे सगळे दु:ख लिहिले होते. सासरचे 3 लाखांची मागणी करत होते.
- त्यांच्या छळाला कंटाळून माझ्या मुलीने दोन महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रारही दिली होती. परंतु, नंतर समजूत घातली आणि केस परत घेतली.
तोंडाला टेप लावून नवरा बेदम मारायचा, सासूही द्यायची साथ
- वडील म्हणाले, सासरच्यांनी तिला काहीतरी पाजले होते. यामुळे ती बेशुद्ध होती. मुलीने आधी सांगितले होते की, पती आणि सासू नेहमी माझ्या तोंडाला टेप लावून बेदम मारहाण करतात.
- ते म्हणाले, घटनेच्या रात्री पत्नी (आशा देवी) चे प्रीतीशी मोबाइलवर बोलणे झाले होते, तेव्हा तिने सांगितले होते की, सासू आणि नवऱ्याने माझ्याशी पुन्हा भांडण केले.
- रात्री एक वाजता तिच्या नवऱ्याने फोन करून सांगितले की, तुमची मुलगी मेली आहे. ते म्हणाले, तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनीच तिचा खून केला. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...