आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला नव्हते दारू प्यायला पैसे, मग पत्नीला केले मित्रांच्या हवाली; 3 दिवस बांधून केले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने पतीच्या मित्रांनी गँगरेप केल्याचा आरोप केला आहे. - Divya Marathi
महिलेने पतीच्या मित्रांनी गँगरेप केल्याचा आरोप केला आहे.
बागपत - येथे एका विवाहितेने तिच्या पतीवर आपल्या दोन मित्रांसह गँगरेप केल्याचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप आहे की, दारूच्या नशेत पतीने त्याच्या 2 मित्रांच्या हवाली केले. यानंतर आरोपींनी तिला बांधून 3 दिवस गँगरेप केला. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 
प्लॉट दाखवायला घेऊन गेला पती आणि केले मित्रांच्या हवाली...
- हे प्रकरण यूपीच्या बागपत जिल्ह्यातील खेकडा परिसरातील आहे. येथे राहणारी निधी (बदललेले नाव) बुधवारी महिला पोलिस स्टेशनमध्ये गेली आणि तिने गँगरेपची तक्रार दाखल केली.
- ती म्हणाली, माझ्या पतीला दारूचे व्यसन आहे. लग्नाच्या वेळी तो खासगी नोकरी करत होता, पण काही काळाने त्याने ती सोडून दिली. वाईट संगतीत येऊन त्याला दारूचे व्यसन लागले. 
- दारूसाठी पैसे न मिळाल्याने तो माझ्यावर इतरांशी संबंध बनवण्यासाठी दबाव आणत होता. नकार दिल्यावर मारहाण करत होता. मला एक लहान मुलगा आहे. त्याने मला लहान मुलासमोर अनेक वेळा बेदम मारहाण केली.
- 3 दिवसांपूर्वी तो मला बहाण्याने आपल्या मित्रांसोबत घेऊन गेला. म्हणाला की, तुला एक प्लॉट दाखवायचा आहे. कारमध्ये आमच्याशिवाय त्याचे 4 मित्रही होते. एका सुनसान जागी कार थांबवून सर्वजण दारू प्यायले. मला संशय आला होता. मी रमेशला परत चलण्यासाठी आग्रह केला. 
- दारूच्या नशेत तर्रर्र रमेशने मला त्याच्या मित्रांच्या हवाली करून परत गेला. मी ओरडत-किंचाळत राहिले, पण त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
- यानंतर आरोपी मला एका खोलीत घेऊन गेले, येथे नराधमांनी मला बांधून माझ्यावर गँगरेप केला.
- 3 दिवस दोन्ही आरोपी मला टॉर्चर करत होते. जेवायला देत नव्हते. मी त्यांना सोडा-सोडा म्हणून भीक मागत होते, मुलगा वाट पाहातोय म्हणाले, पण त्यांनी मला सोडले नाही. दोरीने हातपाय बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबून ठेवायचे. बुधवारी दोघेही बाहेर गेले होते. मी कशीबशी दोरी सोडली आणि तिथून पळून आले.
- महिला पोलिसांतील एसओ प्रतिभा सिंह म्हणाल्या, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची मेडिकल तपासणी करण्यात येईल. रमेश आणि त्याच्या मित्रांच्या घरी छापा टाकण्यात आला, परंतु सर्व फरार आहेत. पुढील तपास सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...