आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने आईला केली \'ती\' डिमांड, उत्तर होते- NO, मग झाले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 वर्षीय मुलीने संतापून नदीत उडी मारून जीव दिला. (इन्सेटमध्ये मृ्त मुलगी) - Divya Marathi
14 वर्षीय मुलीने संतापून नदीत उडी मारून जीव दिला. (इन्सेटमध्ये मृ्त मुलगी)
लखनऊ - शहरात रविवारी एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह नदीमध्ये तरंगताना आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाइकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करून जोरदार हंगामा केला. वास्तविक, एक दिवसाआधीच या मुलीने आपल्या आईला नवा मोबाइल देण्याची मागणी केली होती. नकार मिळाल्याने तिने आईच्या डोळ्यांदेखत नदीमध्ये उडी मारली. नातेवाइकांचा आरोप होता की, मुलीचा शोध पोलिसांनी गांभीर्याने घेतला असता, तर आज ती जिवंत असती.
 
असे आहे प्रकरण..
- रूपपूरच्या हसनगंजची ही घटना आहे. येथे 14 वर्षीय मृत खुशी, वडील बेचूलाल आणि आई कमलासह राहत होती.
- मृत मुलगी एका खासगी शाळेत 6वीत शिकत होती. शनिवारी शाळेतून आल्यानंतर सुमारे 7 वाजता तिने आपल्या आईला मोबाइलची मागणी केली. 
- मृत मुलीचे वडील म्हणाले की, पत्नीने नवा मोबाइल फोन देण्याची मागणी साफ धुडकावली होती. यानंतर नाराज होऊन मुलगी नदीमध्ये जीव देत असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली.
 
आईच्या डोळ्यांदेखत मारली नदीत उडी
- मुलगी घरातून बाहेर पडताच तिची आईही मागेमागे निघाली. तोपर्यंत मुलगी गोमती नदीवरील पक्क्या पुलावर पोहोचलेली होती.
- आईने सांगितले, माझ्या डोळ्यांदेखत मुलीने नदीत उडी मारली. माझा आरडाओरडा ऐकून आजूबाजूला लोक जमा झाले. मी सर्वांना आर्जव करत होते, मदतीची विनवणी करत होते, अक्षरश: भीक मागत होते, पण नदीत उतरायला कोणीच तयार झाले नाही.
 
कुटुंबीयांचा आरोप, पोलिसांनी खूप उशीर केला  
- घटनेची माहिती मिळताच 1 तासाने पोलिस पोहोचले. त्यांच्यासोबत डायव्हर्सही होते. काही वेळ शोध घेतल्यानंतर ते बाहेर आले. आणि म्हणाले की, आता खूप अंधार झालाय, आता पोरगी सापडणे कठीण आहे. सकाळीच पाहू काय ते!
- रविवारी सकाळी अग्रसेन घाटाजवळ मुलीचा मृतदेह नदीत तरंगताना आढळला. नावाड्यांनी तो बाहेर काढला.
- नातेवाइकांनी पोलिसांवरच राग व्यक्त करत रस्त्यावर चक्का जाम केला होता. कित्येक तास समजूत घातल्यानंतर कुठे पोलिसांना यावर नियंत्रण मिळवता आले.
 
काय म्हणतात पोलिस?
- हसनगंजचे पोलिस निरीक्षक पी. के. झा म्हणाले, मुलीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढील कारवाई होईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज
बातम्या आणखी आहेत...