आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार, मग पतीने स्टेशनवर सोडले बेवारस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्तीपूर - येथे 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे मंदिरात लग्न लावून नंतर छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनुसार, लग्नानंतर अल्पवयीन मुलीवर सासऱ्याने बलात्कार केला आणि यानंतर तिच्या पतीने बहाण्याने तिला रेल्वे स्टेशनवर नेले आणि तिथेच बेवारस सोडून दिले.

 

40 वर्षांच्या व्यक्तीशी झाले होते लग्न
- मुलीचे लग्न कल्याणपूरच्या 40 वर्षीय व्यक्तीशी 5 महिन्यांपूर्वी मंदिरात लावण्यात आले होते. तिचे वय फक्त 15 वर्षे आहे. लग्नानंतर मुलगी आपल्या पतीच्या घरी गेली. येथे सासऱ्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. याची माहिती मिळताच तिच्या पतीने तिला मावशीकडे नेण्याच्या बहाण्याने मध्य प्रदेशच्या सतना स्टेशनवर बेवारस अवस्थेत सोडले. येथे भटकत असताना ती टोल नाक्याजवळ पोलिसांना आढळली. यानंतर तिला चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांकडे सोपवण्यात आले.

 

पती आणि सासऱ्यावर पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा - तेजपाल
- सीडब्ल्यूसी अध्यक्ष तेजपाल सिंह म्हणाले की, मुलीचे बळजबरी लग्न लावण्यात आले आहे. तिथे तिच्यावर सासऱ्याने रेप केला. सोबतच यानंतर तिच्या पतीने तिला बेवारस सोडले. दोघांवरही पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला जाईल. याशिवाय बालविवाह लावल्याप्रकरणी इतर कुटुंबीयांनाही शिक्षा दिली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमध्ये पाहा, घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...