आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगाच पाहिजे म्हणत आईने 3 महिन्यांच्या मुलीची हत्या करून मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये लपवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद - येथे मुलाच्या हट्टापायी एका आईने 3 महिन्यांच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये लपवला. आईच्या नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेने रविवारी गाझियाबादमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आरतीला अटक केली आहे. पतीने पोलिसांना सांगितले की, ऑगस्टमध्ये मुलीच्या जन्मानंतर आरती खूप दु:खी होती आणि तिला दूध पाजत नव्हती. आरतीला सोडून पूर्ण कुटुंब मुलीच्या जन्मामुळे खूप खुश होते. जन्मानंतर घरात मोठा सोहळाही आयोजित केला होता.

 

एका वर्षापूर्वी झाले होते आरतीचे लग्न
- शहर एसपी आकाश तोमर म्हणाले, मोदीनगरमध्ये राहणारा मोहित कुमार एका खासगी कंपनीत नोकरी करतो. वर्षभरापूर्वी त्याचे आरतीशी लग्न झाले होते. 25 ऑगस्ट रोजी आरतीने मुलीला जन्म दिला. तिचे नाव शिवानी ठेवण्यात आले, तेव्हा घरात मोठा सोहळाही करण्यात आला होता.
- रविवारी मोहित ऑफिसमध्ये गेला होता. सासरा ब्रजपाल आणि सासू काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दोघांनीही दोन तासांनी परत आल्यावर शिवानीबाबत विचारले. परंतु आरतीने कोणतेही उत्तर दिले नाही. यावर आरती आणि तिच्या सासूत भांडण झाले.
- यादरम्यान मोहितही घरी पोहोचला. सर्वांनी मिळून शिवानीचा शोध घेतला, परंतु ती आढळली नाही. यावर मोहितने पोलिसांना याची माहिती दिली. घरी पोहोचलेल्या पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा वॉशिंग मशीनमध्ये 3 महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.

 

बाळाला दूध पाजत नव्हती आरती 
- मृत बाळाचे वडील मोहित म्हणाले, मुलीला जन्म दिल्यानंतर आरती दु:खी राहत होती. ती आधी शिवानीला आपले दूध पाजत नव्हती. पण कुटुंबीयांनी दबाव टाकल्याने तिने मुलीला दूध पाजणे सुरू केले. आरतीच्या सर्व कुटुंबासमोरच मुलीला मारण्याची भाषा करत होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटो..

बातम्या आणखी आहेत...