आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या मुलीला दिला भयावह मृत्यू, मृतदेहाजवळ बसून रक्त प्यायली आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - शहरातील सर्वात चर्चित प्रकरणात 27 नोव्हेंबर 2017 रोजी हायकोर्टाने पोटच्या मुलीच्या हत्येचा ठपका असणाऱ्या आईची 13 वर्षांनंतर आरोपांतून मुक्तता केली आहे. येथे 2004 मध्ये झालेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. एका आईने आपल्या सात महिन्यांच्या मुलीची गळा चिरून हत्या केली होती. स्थानिकांनुसार, मुलीची हत्या केल्यानंतरही ती तिचे रक्त प्यायली होती. महिला मानसिकदृष्ट्या आजारी होती. सरपंचाने पोलिसांना माहिती देऊन तिला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. 13 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर तिला कोर्टाने गतिमंद असल्याचे सांगून आरोपातून मुक्त केले. DivyaMarathi.Com ने 13 वर्षे जुन्या प्रकरणात हत्येचा आरोप असलेल्या महिलेच्या बुजुर्ग शेजाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा अनेक चकित करणारे खुलासे झाले.

 

घरी आणल्यावर प्रेग्नंट निघाली पत्नी
- घटना सन 2004 ची आहे. गोसाईगंज परिसरातील रामकुमार रिक्षा चालवायचे. रामकुमार म्हणाले, मी त्या वेळी रिक्षा चालवायचो. रिकाम्या वेळेत आम्ही 3-4 रिक्षावाले चौकात एकत्र जमायचो.
- तेथे एक 24 ते 25 वर्षे वयाची तरुणी फाटलेल्या कपड्यांत फिरत होती. ती गतिमंद असल्याचे दिसत होते. ती नेहमी रिक्षावर बायची आणि चलण्यासाठी सांगायची.
- माझे वय तेव्हा 40 च्या जवळपास होते आणि माझे लग्नही झालेले नव्हते. माझ्यासोबत राहणाऱ्यांनी मला सांगितले की, हिला सोबत घेऊन जा आणि पत्नीसारखा सांभाळ कर.
- जर ती ठीक झाली तर तुलाही एक पत्नी मिळून जाईल आणि अन्नाची चिंता दूर होईल. मी तिला घरी आणले. आम्ही पती-पत्नीसारखे राहायला लागलो.
- दोन महिन्यांनी कळले की, ती 3-4 महिन्यांची प्रेग्नंट आहे. मी विचार केला की, हिला घरातून हाकलले तर कुठे जाईल? हिच्यावर पुन्हा कुणीतरी अत्याचार करील. हाच विचार करून मी तिला घरीच ठेवले.
- मी तिच्या बाळालाही आपले नाव देण्याचा निर्णय घेतला. तिला घरी आणल्यावर 8 महिन्यांनी एका मुलीने जन्म घेतला. हळूहळू ती थोडेबहुत घरकामही करायला लागली होती. ती वरणभात बनवायचे शिकली होती.
- चपाती मी स्वत: बनवायचो. फक्त तिची भाषा कळत नव्हती. दिवसामागून दिवस सरत गेले आणि मुलगी 7 महिन्यांची झाली. आम्ही तिचे नाव लक्ष्मी ठेवले होते.

 

13 वर्षांनी कोर्टाने केले निर्दोष मुक्त
- अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाचे न्यायमूर्ती अजय लांबा आणि न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह यांच्या पीठाने आरोपी आईकडून दाखल केलेली अपील मंजूर करत तिला मुक्त केले. आरोपीच्या वैद्यकीय तपासणीतही ही बाब समोर आली की, ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, परंतु अपर सत्र न्यायाधीश लखनऊच्या कोर्टाने तिला दोषी ठरवले होते.
- याविरुद्ध हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. अपीलवर निर्णय सुनावताना पीठाने आपल्या निर्णयात सत्र न्यायालयाचा निकाल फिरवत म्हटले की, अपर सत्र न्यायालयाने प्रकरणावरील निकालात गंभीर चूक केली आहे. वादीने स्वत:च एफआयआरमध्ये आरोपीला मंदबुद्धी असल्याचे सांगितले आहे. अशा वेळी अपर सत्र न्यायाधीशांनी मेडिकल ओपिनियनवरही लक्ष दिले नाही.
- या कॉमेंट्ससोबतच भारतीय दंड विधानच्या कलम 84 चा लाभ देत आरोपी आईला दोषमुक्त करण्यात आले. सोबतच कोर्टाने लखनऊ जिल्हा जेलच्या वरिष्ठ अधीक्षकांना महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.

 

जेलमध्येही अनेकदा भेटायला गेला रामकुमार
-रामकुमार म्हणाला, मी अनेक वेळा पत्नीला भेटायला जेलमध्येही गेलो होतो. मला जाणून घ्यायचे होते की, कोणत्या परिस्थितींत तिने असे बीभत्स पाऊल उचलले. परंतु, सारखे-सारखे विचारूनही तिने काहीच सांगितले नाही.
- प्रत्येक वेळी प्रश्न विचारल्यावर ती खळखळून हसायची. 6 वर्षांपूर्वी मी दुसरे लग्न केले. आता मला तिला सोबत ठेवायचे नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, 7 महिन्यांच्या बाळाच्या आईने केलल्या हत्येचा घटनाक्रम

बातम्या आणखी आहेत...