आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबळ्या सैन्याला या राणीमुळे मिळाली शक्तिवर्धक डिश; असा आहे रुचकर इतिहास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - इतर पारंपरिक पदार्थांसोबतच भारतात प्रचंड लोकप्रिय असलेले डिश म्हणजे बिर्याणी. पण तुम्हाला हे माहिती नसेल की बिर्याणी बनवण्याची आयडिया सर्वप्रथम कुणाला आली होती. divyamarathi.comने इतिहास तज्ज्ञांना बिर्याणीच्या आरंभाबद्दल माहिती विचारण्याचा प्रयत्न केला.
 
मुमताजने खानसाम्याला केला होता हुकूम...
- आगऱ्याच्या बी.आर. आंबेडकर युनिव्हर्सिटीतील इतिहास विभागप्रमुख प्रो. सुगम आनंद सांगतात, ''तसे पाहिले तर बिर्याणीचा इतिहास पर्शियन संस्कृतीशी निगडित आहे. परंतु असेही म्हटले जाते की या डिशला प्रसिद्ध करण्यात शहाजहांची बेगम मुमताजची महत्त्वाची भूमिका आहे.
- मुमताज एकदा शहाजहांच्या सैन्याची पाहणी करण्यासाठी छावणीत गेली होती. तिथे तिने पाहिले की सैनिक खूप अशक्त असून युद्धासाठी अनफिट आहेत. यावर त्वरित त्यांनी आपल्या प्रमुख आचाऱ्याला अशी डिश बनवण्याचा हुकूम सोडला, जी खाल्ल्याने सैनिकांना पुरेपूर पोषण मिळेल. मग काय, आचाऱ्याने भात आणि मटणाच्या मिश्रणातून बिर्याणी तयार केली. मुमताजच्या सांगण्यावरून तांदूळ तुपात फ्राय करण्यात आले. ज्यामुळे ते चिकटणार नाहीत आणि भात मोकळा होईल. चव वाढवण्यासाठी यात केसरचाही वापर करण्यात आला होता.
 
तैमूरने भारतात आणली बिर्याणी...
-बिर्याणीबद्दल प्रचलित आख्यायिकेनुसार, क्रूर शासक तैमूर लंग इ.स.1398 दरम्यान भारतात बिर्याणीची डिश घेऊन आला होता. त्याच्या सैनिकांच्या आहारात याचा प्रामुख्याने समावेश होता.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, भारतातील 7 MOST POPULAR बिर्याणी डिशेस
बातम्या आणखी आहेत...