आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत 8 कोटींनी वाढली होती सोनिया गांधींची संपत्ती, 39 लाखांची आहे ज्वेलरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - रायबरेलीच्या उंचाहार येथील NTPC प्लँटच्या बॉयलरमध्ये बुधवारी जोरदार ब्लास्ट झाला. या अपघातात 26 जणांना जीव गमावावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. अमेठीचे खासदार राहुल गांधी गुरुवारी जखमींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांच्या भेटीबद्दल सोशल मीडियावर कॉमेंट्स आले- "सोनिया गांधींनी रायबरेलीसाठी काहीही केले नाही, तरीही काँग्रेस या दुर्घटनेच्या माध्यमातून यूपी मुख्यमंत्र्यांना टारगेट करू इच्छिते." DivyaMarathi.Com रायबरेलीच्या खासदारांशी निगडित फॅक्ट्स आपल्या वाचकांना सांगत आहे.
 
मुलासाठी सोडली होती जागा...
- सोनिया गांधी लोकसभा निवडणुकीत अमेठीतून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2004 मध्ये त्यांनी मुलगा राहुलसाठी सीट खाली करून रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली.
- 2004 पासून आतापर्यंत सोनिया गांधी रायबरेलीतूनच खासदार आहेत.
 
10 वर्षांत 8 कोटींनी वाढली होती संपत्ती
- 2004 च्या निवडणुकीत सोनियांनी आपली संपत्ती 85 लाख रुपये दाखवली होती.
- 2009च्या निवडणुकीत सोनियांची एकूण संपत्ती 52 लाख रुपयांनी वाढली. तेव्हा त्यांनी 1.37 कोटींची संपत्ती दर्शवली.
=  2014च्या निवडणुकीत त्यांनी 9 कोटी 28 लाख रुपयांची संपत्ती दर्शवली होती. 5 वर्षांत सोनियांनी तब्बल 8 कोटींची संपत्ती जोडली.
- याशिवाय त्यांच्याकडे 39 लाखांचे दागिनेही आहेत.
 
राहुल गांधींच्या संपत्तीतही असाच बदल 
- राहुल गांधींच्या संपत्तीतही त्यांच्या आईप्रमाणेच बदल झाला आहे.
- त्यांनी 2004 मध्ये 55 लाख रुपयांची संपत्ती दर्शवली होती. 2009 मध्ये राहुल यांची संपत्ती वाढून 2.32 कोटींपर्यंत पोहोचली.
- 2014 मध्ये राहुल गांधींनी 9.40 लाख रुपयांची संपत्ती इलेक्शन कमिशनसमोर डिस्क्लोज केली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, केवढी संपत्ती आहे सोनिया- राहुल यांची....
बातम्या आणखी आहेत...