आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त रेल्वेरुळाच्या कंपनावरून ओळखले संकट, वाचवले हजारोंचे प्राण; असे होते हे महान इंजिनिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नवी दिल्ली- ज्या काळी देश गुलामीत खितपत पडलेला होता, तेव्हा एका इंजिनिअरने देशात बदलाचा ध्यास घेतलेला होता. जलसंकटाने शहरे त्रस्त होती. त्या काळी आपल्या कर्तबगारीने कित्येक शहरांचा पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवला. आज Engineers day आहे. या निमित्ताने divyamarathi.com अशा भारतातील पहिल्या इंजिनिअरबद्दल ही विशेष माहिती देत आहे.
 
गरिबीत जन्मले, पण शिक्षणाच्या श्रीमंतीने मिळवला लौकिक
एम. विश्वेश्वरय्या यांचे पूर्ण नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या होते. त्यांचा जन्म म्हैसूरच्या मुद्देनाहल्ली येथे 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या विश्वेश्वरय्यांचे बालपण अभावग्रस्त राहिले. त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या नाहीत. ते 14 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. परंतु, शिक्षणाची प्रचंड ओढ असल्याने त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यात खंड पडू दिला नाही. 
 - स्वत:च्या गुणवत्तेवर त्यांनी स्कॉलरशिप तर मिळवलीच सोबतच त्या काळी मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
 
यामुळे म्हणतात भगीरथ
 - याच यशाच्या बळावर त्यांना मुंबईत असिस्टंट इंजिनिअरची पोस्ट मिळाली. त्या काळी ब्रिटिश शासन होते. यामुळे बहुतांश वरिष्ठ पदांवर इंग्रजांची नियुक्ती व्हायची. त्या काळी त्यांनी आपल्या प्रतिभेने नावाजलेल्या ब्रिटिश इंजिनिअर्सना मात दिली. आपल्या या पदावर कार्यरत असतानाच त्यांनी सर्वात पहिले नैसर्गिक जलस्रोतांमधून घराघरात पाण्याची पोहोचवण्याची सिस्टिम बनवली आणि घाण पाण्याच्या विल्हेवाटीसाठी नाली तसेच नाल्यांची सुयोग्य व्यवस्था बनवली. हे त्यांचे मोठे यश होते. पहिल्याच प्रयत्नात बंगळुरू, पुणे, म्हैसूर, बडोदा, कराची, हैदराबाद, ग्वाल्हेर, इंदूर, कोल्हापूर, सुरत, नाशिक, नागपूर, विजापूर, धारवाडसहित अनेक शहरांना त्यांनी जलसंकटातून मुक्त केले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना कर्नाटकचे भगीरथ म्हटले जाते.
 
जगभरात फॉलो करतात विश्वेश्वरय्यांचा प्लॅन
 - जेव्हा ते केवळ 32 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी सिंधू नदीतून सुक्कुर वस्तीला पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. त्यांची ही पद्धत सर्व इंजिनिअर्सना आवडली. सरकारने सिंचनव्यवस्थेत सुयोग्य बदलांसाठी एक समिती बनवली. यासाठी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी एका नव्या ब्लॉक सिस्टिमचा शोध लावला. त्यांनी स्टीलचे दरवाजे बनवले, जे बंधाऱ्यातून पाण्याचा प्रवाह रोखायला उपयुक्त ठरत होते. त्यांच्या या सिस्टिमची ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जाहीर प्रशंसा केली. आज ही सिस्टिम पूर्ण जगभरात फॉलो केली जाते. विश्वेश्वरय्या यांनी मूसा व इसा या दोन नद्यांचे पाणी अडवण्यासाठीही प्लॅन तयार केला. यानंतर त्यांना म्हैसूरचे चीफ इंजिनिअर म्हणून नियुक्त करण्यात आले. 1912 मध्ये विश्वेश्वरय्या यांना म्हैसूरच्या महाराजांनी दिवान म्हणजेच मुख्यमंत्रिपदी नियुक्त केले. यामुळे त्यांना देशाचे (पारतंत्र्यातील) पहिले उच्चशिक्षित मुख्यमंत्री असेही म्हणता येईल.
 
इतरांनाही केले शिक्षित
- त्यांनी आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातील शाळांची संख्या 4,500 हून वाढवून 10,500 पर्यंत नेली. यासोबतच विद्यार्थ्यांची संख्याही 1,40,000 वरून 3,66,000 पर्यंत गेली. म्हैसूर राज्यात मुलींसाठी वेगळे होस्टेल तसेच प्रथम श्रेणी कॉलेज उघडण्याचे श्रेयही त्यांचेच.
- त्यांनीच देशात पहिल्यांदा तत्कालीन उद्योगांना उदा. सिल्क, संदल, मेटल, स्टील इत्यादींना जपान व इटलीच्या विशेषज्ञांच्या मदतीने आणखी विकसित केले.
 
101व्या वर्षी जगाचा घेतला निरोप
 - देशाची सेवा हेच विश्वेश्वरय्या यांचे अढळ तप होते. 1955 मध्ये त्यांच्या कार्यासाठी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नने गौरवण्यात आले. ते 100 वर्षे वयाचे झाले तेव्हा भारत सरकारने त्यांचे टपाल तिकीट जारी करून त्यांचा गौरव केला. 101 वर्षांच्या दीर्घ आयुष्यानंतर 14 एप्रिल 1962 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, विश्वेश्वरय्यांच्या दूरदृष्टीचा बोध घ्यायला लावणारा किस्सा...
बातम्या आणखी आहेत...