आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे लग्न करायचे टाळतोय हा CRPF जवान, सांगितली जंगलात कशी असते LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यदिनी चंदन कुमार यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. - Divya Marathi
स्वातंत्र्यदिनी चंदन कुमार यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.
इलाहाबाद - सीआरपीएफ आणि आरएएफ 101 वाहिनीत असिस्टंट कमांडर चंदन कुमार यांना स्वातंत्र्यदिनी 'शौर्य चक्र'ने सन्मानित करण्यात आले. divyamarathi.comशी बोलताना चंदन कुमार यांनी आपले अनुभव शेअर केले.
 
यामुळे मिळाले शौर्य चक्र...
- सुलतानपूर जिल्ह्याच्या चांदपूर गावात जन्मलेल्या चंदन यांना जानेवारी 2016 मध्ये नक्षल्यांशी उडालेल्या चकमकीमुळे शौर्य चक्र देण्यात आले.
- ते म्हणाले, मी 205 कोब्रा बटालियनचा लीडर होतो. 18 जानेवारी 2016 रोजी आम्ही दररोजची गस्त मारायला निघालो. तेव्हा अचानक लपून बसलेल्या नक्षल्यांनी हल्ला चढवला. मी माझ्या सहकाऱ्यांसह त्यांचा जोरदार सामना केला आणि 7 जणांना कंठस्नान घातले. एवढेच नाही, आम्ही त्यांचे हत्यार आणि भूसुरुंगही ताब्यात घेतले.
 
स्वत: उचलला ग्रॅज्युएशनचा खर्च
- चंदन सांगतात, मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझे वडील मणिराम शेती करतात आणि आई रामदुलारी घर सांभाळते. मला दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत.
- मी लहानपणापासूनच अभ्यासात पुढे होतो. मी गौरीगंजमधून शिक्षण पूर्ण केले. नंतर ग्रॅज्युएशनसाठी इलाहाबाद विद्यापीठात अॅडमिशन घेतले. माझ्या वडिलांकडे आम्हा सर्व भावंडांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याइतके पैसे नव्हते. म्हणून मी माझ्या शिक्षणाचा खर्च स्वत:च उचलला.
- ग्रॅज्युएशनदरम्यानच मी सागर अकॅडमीत गेस्ट लेक्चररचा जॉब केला. तिथूनच माझ्या शिक्षणाचा खर्च भागवला. माझे मार्क्स चांगले होते. म्हणून मला 2009 मध्ये पीजीसाठी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अॅडमिशन मिळाले. 2012 मध्ये MA कम्प्लिट होताच मी सीआरपीएफची परीक्षा दिली. माझे नशीब आणि मेहनत फळाला आली, मी सिलेक्ट झालो. 
अशा जागी मिळाली पोस्टिंग की लग्नाचा विचारच सोडून दिला
- चंदन म्हणाले, माझी पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त एरियात झाली. तिथे पावला-पावलावर जिवाला धोका आहे. नक्षली लपून बसलेले असतात, केव्हा काय होईल माहीत नाही. घरच्यांशी कोणताही संपर्क होत नाही. फोर्सेसमध्ये जीवन खूप कठीण असते. हेच कारण आहे की मी आजपर्यंत लग्नाचे टाळत आलोय.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जंगलात अँटी नक्षली ऑपरेशन्सदरम्यानचे अनुभव...
बातम्या आणखी आहेत...