आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दारात का बसलीयेस? घरात चल!\' म्हणून तरुणाने केले असे; नात्यालाही फासला काळिमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणी नात्याने मुलाची आत्या लागते. - Divya Marathi
पीडित तरुणी नात्याने मुलाची आत्या लागते.
सुपौल - आत्या आणि भाच्याच्या नात्याला बिहारच्या सुपौलमध्ये एका तरुणाने काळिमा फासला आहे. आईवडील एका लग्नाला गेल्यानंतर 15 वर्षीय मुलगी दारात बसून कुणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी नात्याने मुलीचा भाचा असलेला तरुण तिथे आला आणि तू काय करतेस असे विचारू लागला? मुलगी म्हणाली, आईला फोन लावतेय. त्यावर तरुणाने तिचा फोन घेतला आणि म्हणाला, घरात चल, तुला फोन लावून देतो.
 
रूममध्ये बंद करून केला बलात्कार
- ही घटना बिहारच्या सुपौल जिल्ह्यात घडली. घरात कोणीच नव्हते, यामुळे मुलगी घाबरली होती. तिने भाच्याला म्हटले की, माझा फोन मला परत दे, मला मम्मीला बोलायचे आहे.
- भाच्यावर याचा काहीच परिणाम नाही झाला. त्याने तिचा हात पकडून तिला रूममध्ये नेले आणि आतून दरवाजा बंद केला. रूममध्ये बंद केल्यानंतर तरुणाने या लहान आत्यावर बलात्कार केला. यादरम्यान, मुलगी ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिची छोटी बहीण तिथे पोहोचली आणि दार वाजवू लागली.
- रूमबाहेर कुणीतरी आलेय म्हणून तरुणाने तिला तसेच सोडले आणि दार उघडून तिच्या बहिणीला धमकी दिली की, याची कुणाला माहिती दिलीस तर परिणाम वाईट होतील.
 
तक्रार केल्यावर झाली मारहाण
- मुलीवर रेप करून भाच्याने गाव सोडून पळ काढला. यादरम्यान मुलीने आपल्या आईवडिलांना घटनेची माहिती दिली.
- पीडित मुलीचे आईवडील तरुणाच्या आईवडिलांकडे तक्रार घेऊन गेले तर, आपल्या मुलाला शिक्षा करण्याऐवजी त्यांनी मुलीच्याच आईवडिलांवर राग काढला.
- तरुणाच्या घरच्यांनी पीडितेच्या आईवडिलांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर मात्र पीडितेच्या पालकांनी सरळ पोलिस स्टेशन गाठून न्याय देण्याची विनवणी केली.
- महिला पोलिस स्टेशन प्रभारी प्रेमलता भूपाश्री यांनी एफआयआर दाखल करून मुलीची मेडिकल टेस्ट करायला लावली. प्रेमलता म्हणाल्या, आरोपी तरुणाविरोधात पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...