आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीप्रीतने आजोबांना दिले होते वचन- राम रहीमला बरबाद करूनच दाखवीन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबाने हनीप्रीतचा भोग घेतल्याने तिनेच त्याला बरबाद करण्याचा कट रचला होता, असा खुलासा डेरा भक्ताने चॅनलवर केला. - Divya Marathi
बाबाने हनीप्रीतचा भोग घेतल्याने तिनेच त्याला बरबाद करण्याचा कट रचला होता, असा खुलासा डेरा भक्ताने चॅनलवर केला.
नवी दिल्ली/रोहतक - साध्वी बलात्कार प्रकरणात तुरुंगाच्या गजाआड पोहोचलेल्या गुरमित राम रहीमच्या काळ्या कृत्यांवर दररोज नवा खुलासा होत आहे. आता डेऱ्याच्या एका अनुयायाने खुलासा केला की, बाबा अश्लील चित्रपट पाहण्याचा शौकीन होता. दुसरीकडे, हनीप्रीत इन्सां ऊर्फ प्रियंकानेच बाबाला नियोजनपूर्वक कट करून बरबाद केले.
 
जेव्हा बाबाची नजर प्रियंकावर पडली...
- डेऱ्यात जन्मलेले भक्त गुरदास सिंग यांनी एका चॅनलला सांगितले की, हनीप्रीतचे आजोबा डेऱ्याच्या अकाउंटची जबाबदारी सांभाळायचे. तर तिचे आईवडील फतेहाबादमध्ये राहायचे.
- वडील व्यवसाय करत होते आणि हनीप्रीत ऊर्फ प्रियंका तेथे शिकायची. यादरम्यान तिचे डेऱ्यात येणे-जाणे सुरू असायचे.
- तेव्हा राम रहीमची नजर 9वीत शिकणाऱ्या प्रियंका तनेजावर पडली. यानंतर राम रहीमने प्रियंकाच्या कुटुंबाच्या गाठीभेटी वाढवल्या.
- प्रियंका मोठी हाताच बाबाने तिला दत्तक घेतले आणि तिचे नाव हनीप्रीत इन्सां ठेवले.
- यानंतर अचानक हनीप्रीतचे लग्न डेरा भक्त असलेल्या कुटुंबात विश्वास गुप्ताशी लावले.
 
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गेला गुफेत घेऊन
- लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बाबा राम रहीमने हनीप्रीतच्या पूर्ण कुटुंबाला डेऱ्यात बनलेल्या गुफेत बोलावले.
- यानंतर सर्वांना तेथून जाण्यास सांगितले आणि हनीप्रीतला काहीतरी समजून सांगणार असल्याचे म्हणून तिथेच थांबवून ठेवले.
- गुफेत हनीप्रीतसोबत बाबाने रेप केला, ही गोष्ट हनीप्रीतच्या आजोबांना कळली.
- मग मोठा गोंधळ उडाल्यावर राम रहीमच्या चेल्यांनी हनीप्रीतच्या आजोबांना बंदुकीच्या दस्त्यांनी मारहाण केली आणि गप्प राहण्याची धमकी दिली.
- या घटनेनंतर हनीप्रीत तिचा नवरा विश्वास गुप्तासह डेरा सोडून पळून आली, परंतु बाबाच्या चेल्यांनी बंदुकीच्या धाकावर हनीप्रीतला परत आणले.
- अशा छळामुळे संतापून हनीप्रीतने आपल्या आजोबांना वचन दिले की, या बाबाला एक दिवस बरबाद करूनच दाखवीन.
 
विचारपूर्वक रचलेला कट
- डेऱ्याच्या भक्तावर विश्वास ठेवल्यास, हे सर्व हनीप्रीतने विचारपूर्वक कट रचून घडवून आणले होते.
- अगोदर तर हनीप्रीतने राम रहीमला डेऱ्याचा संत ते फिल्मी अॅक्टर आणि सिंगरसुद्धा बनवले, यामुळे बाबाचा प्रतिमा मलिन झाली.
- यानंतर तिने बाबासाठी साध्वींना गळाला लावले. मग बाबा राम रहीम साध्वी बलात्कारप्रकरणी जेलमध्ये पोहोचला आणि हनीप्रीत फरार झाली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हनीप्रीत तिचा नवरा विश्वास गुप्ता आणि बलात्कारी बाबाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...