आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची 3 वर्षेपूर्ती: देशाच्या सर्वात मोठ्या \'भास्कर सर्व्हे\'त 2 लाख लोकांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामाबद्दल ‘दैनिक भास्कर-दिव्य मराठी’चे देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मोदींच्या विजयास आज बरोबर ३ वर्षे झाली आहेत. वाचकांच्याच पाठबळाच्या जोरावर हे देशातील सर्वात मोठे सर्वेक्षण म्हणून समोर आले आहे. 

या सर्व्हेत २ लाखांपेक्षा जास्त वाचकांनी भाग घेतला. देशात कोणत्याही सरकारच्या कामावरील हा आजवरचा सर्वात मोठा सर्व्हे आहे. दै.भास्कर दक्षिणेतील पाच राज्यांत नाही; यामुळे संपूर्ण देशाचे जनमत मिळावे म्हणून भास्करने ‘मार्केट सॅपियन्स’ सर्व्हे संस्थेच्या माध्यमातून तेथे सर्व्हे केला. वन-ऑन-वन मॉडेलनुसार पाच हजार लोकांचे मत जाणून घेण्यात आले. 

सर्व्हेचे प्रश्न, त्यांच्या उत्तरांवर २६ मे रोजी ‘दैनिक भास्कर’ विशेष अंक प्रकाशित करेल. तीन वर्षांपूर्वी २६ मे २०१४ रोजी मोदी सरकारचा शपथविधी झाला होता. सर्व्हेत बहुमूल्य मत नोंदवण्यासाठी आपणा सर्वांचे आभार.
 
पुढील स्लाइडवर वाचा, भास्करच्या वाचकांनी घडवला देशात सर्वात मोठा सर्व्हे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...