आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाइट शिफ्टला पायी जात होती नर्स, 3 जणांनी पकडून सुनसान जागी नेले अन् केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेली - बुधवारी रात्री ड्यूटीवर जात असलेल्या नर्सला शर्मानगरजवळ तीन गुंडांनी किडनॅप करून गँगरेप केला. किडनॅप करताना नर्स तिच्या पतीशी फोनवर बोलत होती. नराधमांच्या तावडीत सापडल्यावर तिचे ओरडणे पतीने फोनवर ऐकले होते. रात्रीच्या वेळी पती आणि पोलिस शोधायला निघाले तेव्हा नर्स आक्षेपार्ह अवस्थेत आढळली.

 

एक आठवड्यापूर्वीच लागली होती नाइट शिफ्ट
- फतेहगंजचा रहिवासी पीडितेचा पती एका शिक्षण संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. तर त्याची पत्नी मेडिकल कॉलेजमध्ये काँट्रॅक्टवर नर्स म्हणून काम करते. दोन महिन्यांपूर्वी या दांपत्याने पीलीभीत बायपासजवळ किरायाने खोली घेतली.
- एका आठवड्यापासून नर्सची नाइट शिफ्ट सुरू होती. बुधवारी रात्री 8.45 वाजता ती ड्यूटीसाठी पायीच कॉलनीतून निघून मेन रोडकडे जात होती. त्या वेळी तीन जणांनी तिला किडनॅप करून गँगरेप केला.
- यादरम्यान ती मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत राहिली. तिचा आवाज ऐकून एक सायकलस्वार थांबलाही होता. तो तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करताच तिन्ही गुंडांनी त्याला बंदुकीचा धाक दाखवून पळवून लावले.

 

पती आणि पोलिसांनी घेतला शोध
- घटनेच्या काही वेळानंतर नर्सचा पती आणि यूपी पोलिसांचे पथक तिला शोधत आले. पोलिसांचा सायरन ऐकताच नराधम स्कूटीने पळून गेले.
- यानंतर लगेच पोलिसांनी महिलेला पोलिस स्टेशनमध्ये आणले. तिला दुखापत झालेली होती तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रात्रीच तिला मेडिकल चेकअपसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.

 

स्कूटी नंबरच्या आधारे आरोपींना पकडले
- घटना घडल्यानंतर स्कूटीने तिन्ही आरोपी तेथून निघाले. याआधारे पोलिसांनी शोध घेतल्यावर तिन्ही आरोपींना जितू ऊर्फ श्यामसुंदर, हरद्वारी आणि विक्कीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेले तिन्ही आरोपी सराई गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरी, धमकी देणे, दरोड्याचा कट रचणे असे गुन्हे दाखल आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून संपूर्ण घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...