आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मुलीला मिळाली 40 लाखांच्या पॅकेजची नोकरी, वडिलांचे आहे कपड्यांचे दुकान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या मधुबनीमध्ये राहणारी मेधा कुमारी हिचे एडॉवमध्ये सिलेक्शन झाले आहे. मेधाला 40 लाख वार्षिक पॅकेज मिळाले आहे. ही मेधाची पहिली नोकरी आहे. मेधाच्या वडिलांचे मधुबनीमध्येच कपड्यांचे दुकान आहे. मेधा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पाटणामध्ये काम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी आहे.

 

ऑनलाइन दिली होती टेस्ट
- पाटणा NIT ची विद्यार्थिनी मेधा कुमारीची 39.5 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर प्लेसमेंट झाली आहे. नोएडा येथील सॉफ्टवेअर कंपनी एडॉव सिस्टिमसाठी तिने ऑनलाइन टेस्ट दिली होती. यानंतर कंपनीने 39.5 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली. एनआयटीचे प्लेसमेंट इंचार्ज म्हणाले की, एखाद्या स्टुडंटला एवढे मोठे पॅकेज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

याआधी आली होती 8.75 लाखांची ऑफर
- सूत्रांनुसार, एडॉवच्या आधी मेधाला योडले कंपनीकडून 8.75 लाखांची ऑफर आली होती. परंतु मेधाने नकार दिला होता. एडॉवसाठी ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर तिला चांगली ऑफर मिळण्याचा आत्मविश्वास होता. कंपनीने कोलकात्यामध्ये तिची मुलाखत घेतली होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मेधाबाबत...

बातम्या आणखी आहेत...