आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरनाथ हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांना अटक, लष्कर ए तोयबाने घडवला हल्ला: J&K पोलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले की, अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्करचा हात होता. यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी मुनीर खान यांनी रविवारी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, आरोपींनी सगळी माहिती दिली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळखही पटवण्यात आली आहे. अनंतनागमध्ये 10 जुलैच्या रात्री झालेल्या हल्ल्यात 5 महिलांसह 7 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. 15 यात्रेकरू जखमीही झाले होते. हल्ल्यातील पीडित 3 यात्रेकरू गुजरात, 2 दमन आणि 2 महाराष्ट्रातील होते. हे सर्व यात्रा पूर्ण करून जम्मूला परतत होते.
 
पाकिस्तानी दहशतवाद्यासोबत 1 स्थानिकही होता सामील
- मुनीर खान म्हणाले की, या हल्ल्यात लष्करच्या इस्माइलशिवाय दोन आणखी पाक दहशतवादी सामील होते. त्यांच्यासोबत काश्मिरी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला घडवला.
- ज्या लोकांनी हा हल्ला घडवण्यात मदत केली, तसेच दहशतवाद्यांना गाइड केले होते त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. काही दिवसांआधी लष्कर ए तोयबाचे 2 दहशतवादीही मारले गेले होते. या हल्ल्यातील त्यांच्या सहभागाचीही चौकशी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...