आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस कंडक्टरचे पाप असे आले उजेडात, मृत चिमुरड्याच्या 3 मित्रांनी केली पोलखोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्सेट आरोपी. त्याने बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रत्यन केला. मुलगा ओरडल्याने त्याचा गळा चिरून खून केला. - Divya Marathi
इन्सेट आरोपी. त्याने बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रत्यन केला. मुलगा ओरडल्याने त्याचा गळा चिरून खून केला.
गुडगाव - येथील रेयान इंटरनॅशनल शाळेत 7 वर्षीय मुलाच्या खुनाचा आरोपी बस कंडक्टर अशोकला पोलिसांनी घटनेच्या 12 तासांनी अटक केली होती. पोलिस म्हणाले की, मृत मुलाच्या 3 मित्रांनी सांगितले की, बस कंडक्टर बाथरूम आणि बाहेर ठेवलेल्या वॉटर कूलरवर हात धूत असताना दिसला होता. पोलिसांनी शाळेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, यात पुरावे आढळले. याच आधारावर शाळेच्या 9 बसचालक आणि कंडक्टरना बोलावण्यात आले. मुलांनी आरोपी कंडक्टर अशोकची ओळख पटवली. पोलिसांनी अगोदर चौकशीसाठी अशोकला कस्टडीत घेतले.
 
गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, बुद्धी भ्रष्ट झाली होती...
- आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत बस कंडक्टर म्हणून नियुक्त झाला होता. त्याने मीडियाला सांगितले, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये होतो. तेथे वाईट काम करत होतो. तेवढ्यात तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. मी त्याला धक्का दिला, मग ओढले. तो ओरडायला लागल्याने मी घाबरलो. मग मी दोन वेळा चाकूने त्याला कापले. त्याला गळा चिरला.
- तू पूर्वीही एखाद्या मुलाचे असे लैंगिक शोषण केले आहे का, हे विचारल्यावर आरोपी म्हणाला, नाही, हे पहिल्यांदाच केले होते. मी घाबरलो होतो. कळले नाही कसे केले. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मला त्याच्यावर अत्याचार करायचा होता. पण केला नाही.
- चाकूबाबत विचारल्यावर अशोक म्हणाला, तो भाजी चिरण्याचा चाकू होता. तो घाण झाला होता. साफ करण्यासाठी टॉयलेटमध्ये आणला होता. त्यानेच मुलाचा गळा चिरला.
- तुला मुलांच्या टॉयलेटमध्ये जाण्यापासून कोणी रोखले नव्हते का? हे विचारल्यावर अशोक म्हणाला, आम्ही नेहमीच तेथे जायचो, अनेक वेळा पाहिले जात होते, तेव्हा आम्हाला टोकत होते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...