आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Has Bank Account In UK See Congress President Files Nomination Details

राहुल गांधींचे UK मध्येही आहे बँक अकाउंट, असे आहेत संपत्तीचे डिटेल्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी नॉमिनेशन दाखल केले आहे. मनमोहनसिंगांनी त्यांना काँग्रेसची डार्लिंग म्हणून संबोधित केले आहे, दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, राहुल एक उत्तम पंतप्रधान बनू शकतात. राहुल गांधी पहिल्यांदा 2004 मध्ये संसदेत गेले होते. DivyaMarathi.Com त्यांच्या राजकीय प्रवासादरम्यान वाढलेल्या संपत्तीची माहिती आपल्या वाचकांना देत आहे.

 

यूकेच्या HSBC बँकेत आहेत 2 अकाउंट
- राहुल गांधी 2004 मध्ये अमेठीतून खासदार बनले होते. तेव्हा सबमिट केलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये यूकेमध्ये HSBC बँकेतीन तीन अकाउंट्सची डिटेल मेन्शन केलेली होती. यातील एक अकाउंट ई-ट्रेड सिक्युरिटीचे होते. 2004 मध्ये दिलेल्या 3 अकाउंट्सचा तपशील असा होता...

1. HBSC uk A/c No.58332832 - बॅलेन्स 8.1 लाख रुपये (18,600 डॉलर)
2. HSBC uk A/c No.61761927 - बॅलेन्स 2.2 लाख रुपये (2700 पाउंड)
3. US$ A/c No.47940239 - बॅलेन्स 26 हजार रुपये.

 

10 वर्षांत असे होते विदेशी बँकेतील बॅलेन्स
2004 - 10.6 लाख रुपये
2009 - 7.3 लाख रुपये
2014 - 1.8 लाख रुपये


10 वर्षांत 1600% वाढली संपत्ती
- राहुल गांधींनी 2004च्या अॅफिडेव्हिटमध्ये 55.4 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
- फक्त 5 वर्षांत ते लखपतीचे करोडपती झाले आणि त्यांची संपत्ती वाढून 2.32 कोटी रुपये नोंदवली गेली. (तब्बल 320%)
- 2014च्या  सर्वसाधारण निवडणुकीत अमेठीतून नॉमिनेशन फाइल करत राहुल गांधींनी 9.4 कोटी संपत्तीची नोंद केली. 2004 मध्ये दाखवलेल्या 55 लाख रुपयांपेक्षा 2014 मध्ये त्यांची संपत्ती 1600 टक्के जास्त आहे.

(नोट - संपत्तीचे सर्व डिटेल्स ADR मधून घेतलेले आहेत.)

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, काय-काय संपत्ती आहे राहुल गांधी यांची...

बातम्या आणखी आहेत...