आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजारांना एक पपई विकत होता बाबा, सोन्याच्या भावात विकला जात होता भाजीपाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमला तुरुंगात माळीकाम मिळाले आहे. त्यासाठी त्याला 40 रुपये रोज मजूरी मिळणार आहे. मात्र ऐशोआरामात जीवन जगणारा बाबा राम रहिम स्वतःला देवाचा दूत म्हणून घेत होता. धर्माच्या आडून तो लोकांच्या श्रद्धेशी खेळत असल्याची अनेक प्रकरणे आता उघड होत आहेत. गुरमीत राम रहिमच्या डेऱ्यातील बागेतील भाज्या आणि फळे सोन्याच्या भावाने विकली जात होती. 
 
एक हिरवी मिरची एक हजार रुपये, अर्धा किलो टॉमॅटो लाखाचे 
- बाबा राम रहिमचे मुख्यालय असलेल्या सिरसा येथील डेऱ्याची एकूण जमीन 700 एकर आहे. डेऱ्यात शेकडो एकर जमीनीवर राम रहिम शेती करायचा. 
- डेऱ्यात पिकवलेली फळे आणि भाजीपाला भक्तांना मनमनी किंमतीत विकला जात होता. भक्तही बाबांचा प्रसाद म्हणून अव्वाच्या सव्वा किंमतीला ते घेत होते. 
 
एका पपईची किंमत 5000 रुपये 
- बाबा राम रहिम डेऱ्यात येणाऱ्या भक्तांना एक हिरवी मिरची एक हजार रुपयांना देत होता. 
- वांगी ही सर्वच प्रांतात आवडीने खाल्ली जातात. वांग्यांच्या साइज नुसार बाबा त्यांची किंमत ठरवत होता. छोट्या आकाराची वांगी असतील तर एका वांग्यासाठी हजार रुपये आणि मोठ्या आकारांची वांगी त्यापेक्षा हजार-पाचशेने महाग विकली जात होती. 
- एखाद्याने बाबांचा प्रसाद म्हणून अर्धा किलो टॉमॅटो विकत घेतली तर ती जवळपास लाख रुपयांना जात होती. 
- राम रहिम देवाचा प्रसाद म्हणून भक्तांच्या श्रद्धांशी असा खेळ करत होता आणि एक-एक पपई पाच-पाच हजार रुपयांना विकत होता. 
 
अशी होत होती होम डिलिव्हरी 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार बाबा डेऱ्यातील शेतीतील फळे आणि भाजीपाला भक्तांना घरपोच पोहचवात होता. होम डिलिव्हरी करण्याची जबाबदारी भंगीदासची होती. आश्रमातील संचलनाचे काम भंगीदास करत होता.
- ग्रामीण आणि शहरी भागात घरा-घरात जाऊन लोकांना डेऱ्याशी जोडण्याचे काम भंगीदार यांच्यावर होते, त्यांच्यावरती एका ब्लॉकसाठी एक भंगीदास नेमलेला असायचा. हे लोक घरा-घरात जाऊन बाबाचे गुणगाण सांगत होते. 
 
यामुळे एवढा महाग भाजीपाला खरेदी करत होते भक्त  
-  बाबा राम रहिमसाठी त्याचे भक्त काहीही करण्यास तयार होते. त्यामुळेच एवढा महाग भाजीपाला ते प्रसाद म्हणून खरेदी करत होते. 
- भक्त म्हणायचे की आमच्या बाबाने स्वतःच्या हाताने हा भाजीपाला आणि फळे उगवली आहेत. हे खाल्ल्याने आम्हाला कोणताच आजार होणार नाही. 
- भक्तांची श्रद्धा एवढी अंधळी होती की बाबाच्या डेऱ्यातील एक टॉमॅटो कुटुंबांतील सर्वजण खात होते. 
- एक तुकडाही आपल्या वाट्याला आला तरी भक्त भरून पावल्याचे सुख अनुभवत होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबाचे शेतातील काही निवडक फोटो..
बातम्या आणखी आहेत...