आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरने आईला केले बेशुद्ध; आजारी मुलीवर केला रेप; \'त्या\' घटनेचा खूप खोलवर झाला परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद - हरियाणाच्या फतेहाबादमध्ये 10 दिवसांपूर्वी उपचारांसाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरने रेप केल्यानंतर ती अजूनही धक्क्यातून सावरलेली नाहीये. यादरम्यान तिचा मेडिकल एक्झामचा रिझल्ट आला आहे, पण तिला या रिझल्टचा आनंद जाणवत नाहीये. रिझल्टमध्ये पीडिता विद्यार्थिनी विद्यापीठाच्या टॉप - 10 विद्यार्थ्यांत आली आहे. तिच्या मनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला आहे. 
 
उपचारांच्या बहाण्याने डॉक्टरने घाण काम केले : पीडिता
- तरुणी म्हणाली, 27 ऑक्टोबरला ती डॉ. जिम्मी जिंदल यांनी उपचारांसाठी घाण काम केले. मोठ्या मुश्किलीने मी घरी सांगू शकले.
- कुटुंबाला कळताच त्यांनी डॉक्टरला मारहाण केली होती. काही तासांतच शहरात खूप काही घडले. नुकताच तिचा रिझल्ट आला आहे, यात ती टॉप टेनमध्ये आली आहे. पण तिला याचा आनंद साजरा करता येत नाहीये. 22 वर्षांची ही तरुणी अभ्यासात खूप हुशार होती, प्रत्येक वर्गात, प्रत्येक परीक्षेत ती अव्वल राहिली. तिला स्कॉलरशिपही मिळालेली आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना शुक्रवार दुपारची आहे. मानसिक रोग्यांचे रुग्णालय चालवणारा डॉ. जिम्मी जिंदलच्या दुकानात काही लोक शिरतात.
- त्यांचा आरोप होता की, डेंग्यू झालेली एक तरुणी मानसिक उपचारांसाठी आपल्या आईसह डॉक्टर जिम्मीकडे गेले होते.
- त्यांचा आरोप आहे की, डॉक्टर जिम्मी जिंदलने तरुणीच्या आईला अंमली पदार्थ खाऊ घालून बेशुद्ध केले आणि तरुणीला तपासणी करण्याच्या बहाण्याने बाइकवर बसवून आपल्या घरी नेले.
- घरी जाऊन त्याने तरुणीवर बलात्कार केला. हा आरोप करून तरुणीच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी तोडफोड केली आणि डॉक्टर जिम्मी जिंदलला बेदम मारहाणही केली.
- एवढेच करून ते थांबले नाहीत, तर डॉक्टरला नग्न करून, तोंड काळे करून त्याची पूर्ण शहरात धिंड काढली.
नोट: फोटोचा वापर न्यूज रिप्रेझेंटेशनसाठी करण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, निकालाबाबत काय म्हणाली पीडित तरुणी...
बातम्या आणखी आहेत...