आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाऱ्याने केला विवाहितेवर रेप; व्हिडीओ व्हायरल झाल्याने पतीने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. - Divya Marathi
महिलेने शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
जौनपूर - येथे एका विवाहित महिलेने तिच्यावर शेजाऱ्यानेच घरात घुसून रेप केल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईत कामानिमित्त राहणाऱ्या तिच्या नवऱ्यानेही तिच्यापासून संबंध तोडले आहेत. नवरा म्हणाला, मी आता तुला सोबत ठेवणार नाही, माझी बदनामी होईल. याप्रकरणी पोलिस म्हणाले की, पूर्ण तपासानंतर कारवाई केली जाईल.
 
असे आहे प्रकरण?
 - हे प्रकरण जौनपूरच्या चंदवक परिसरातील आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली की, शेजारी राहणाऱ्याने संजयने तिच्यावर अत्याचार केला. तिचा नवरा मुंबईत काम करतो. गुंड प्रवृत्तीच्या संजयने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. न्यायासाठी आक्रोश करतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला.

नवरा म्हणाला, तुला सांभाळू शकणार नाही, माझी बदनामी होईल
 - महिला म्हणाली की, माझा जो आक्रोश करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो मुंबईत राहणाऱ्या माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचला. त्याने फोन करून सांगितले की, तुझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, आता मी तुला नांदवणार नाही, माझी खूप बदनामी होईल.
 
आरोपी म्हणाला, भांडणात थोडे लागले असेल, महिलेने स्वत:च कपडे फाडले
 - आरोपी संजय म्हणाला, माझी मुलगी बेपत्ता आहे, त्याची पोलिसांत तक्रारही नोंद आहे. महिला तिची मैत्रीण आहे. 27 ऑगस्टला माझी पत्नी हेच विचारायला गेली की, काही माहिती असेल तर सांगून टाक. तिने अचानक मारहाणच सुरू केली. मी सोडवायला गेलो असता, ती मलाही भांडू लागली, यादरम्यान तिला दुखापत झाली असेल. ती कपडे फाडून अडकवण्याची धमकी देत होती. कसेबसे प्रकरण शांत झाले. तिने कंट्रोल रूमला फोन करून पोलिसांना बोलावले. पोलिस मला घेऊन आले आणि 151 लावला. मग जामिनावर मला सोडण्यात आले.

पोलिस म्हणाले - मेडिकल झाल्यानंतर पुढची कारवाई होईल
 - एसओ विश्वजित सिंह म्हणाले, घटनेच्या दिवशी मेडिकल करून मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली होती. महिलेला पुन्हा केस ओपन करायची आहे. मेडिकलनंतर हे प्रकरण पुढे नेण्यात येईल. 
 - सीओ नृपेंद्र म्हणाले की, महिलेचे मेडिकल करण्यात येईल, ज्या बाबी समोर येतील, त्यावरून कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बलात्कार पीडित महिलेची आपबीती...
बातम्या आणखी आहेत...