Home »National »Other State» Real And Fake Ram Rahim Row Goes Viral On Social Media

जेलमध्ये नकली राम रहीम? यामुळे केला जात आहे शॉकिंग दावा, हे आहे सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Sep 09, 2017, 11:40 AM IST

  • बाबाचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
रोहतक (हरियाणा) - सुनारिया जेलमध्ये 20 वर्षांची कैद भोगत असलेला बलात्कारी राम रहीम हा खरा नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, राम रहीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बाबाच्या दोन फोटोंबद्दल माहिती दिली जात. या 2 फोटोंमध्ये फक्त 10 दिवसांचे अंतर असून बाबाचे केस एवढ्या कमी दिवसांत इतके कसे वाढले? हाच सवाल विचारला जातोय. यावरून तुरुंगात असलेला बाबा खरा नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
 
असे आहे प्रकरण
- साध्वी बलात्कारप्रकरणी शिक्षा होण्याआधी बाबा राम रहीमने आपल्या वाढदिवसाचा तब्बल आठवडाभराचा सोहळा डेऱ्यामध्ये आयोजित केला होता.
- शेवटच्या दिवशी 16 ऑगस्टला हरियाणाचे शिक्षण मंत्री रामबिलास शर्मा यांनी बाबाच्या पायावर डोके टेकवले होते. त्याच फंक्शनमध्ये बाबाच्या डोक्यावरील केस खूप छोटे असल्याचे दिसले. दाढीही खूप कमी होती.
- यानंतर 10 दिवसांनीच 25 ऑगस्टला बाबा जेव्हा पंचकुलामध्ये सीबीआय कोर्टाद्वारे दोषी ठरल्यानंतर बाहेर निघाला तेव्हा त्याची दाढी खूप वाढलेली होती आणि डोक्यावरील केसही मोठे दिसत होते.
- यामुळेच प्रश्न विचारला जातोय की, फक्त 10 दिवसांतच बाबाचे केस एवढे वाढले कसे? बाबाने विग जरी लावली होती तरी ती कोणत्या दिवशी लावली? डेऱ्यात बर्थडे फंक्शनवाल्या दिवशी की पंचकुला कोर्टात हजर होण्याच्या दिवशी?
 
काय म्हणतात पोलिस?
- दोन्ही फोटो पाहून हेअरस्टाइल स्पेशालिस्ट म्हणाले की, विग केसांमध्ये लपवले जाऊ शकते. पण ते डोक्याच्या मागच्या बाजूचा उभारही दिसायला हवा. बाबाच्या बर्थडेच्या दिवशी फोटोत खूप कमी आणि खरे केस असल्याचे दिसतेय.
 - दुसरीकडे, हरियाणा जेलचे अधिकारी म्हणाले की, जेलमध्ये पाठवण्याआधीच पोलिसांनी पडताळणी केली होती की, आरोपी खरा आहे की नाही!
 
आरोपीची पूर्ण पडताळणी करतात पोलिस
 - केसच्या ट्रायलदरम्यान पोलिस प्रत्येक सुनावणीला आरोपीची स्वाक्षरी घेतात.
 - आरोपीचे नाव, वडिलांचे नाव, जात, पत्ता आणि सरकारी ओळखपत्र पुरावा म्हणून फाइलमध्ये लावतात.
 - आरोपीच्या शरीरावरील खुणाही यात नोंदवतात.
 - याशिवाय आरोपीचे फिंगरप्रिंट्सही घेतले जातात.
 
काय म्हणतात तज्ज्ञ?
 - हबीब हेअर ड्रेसरचे मॅनेजर माही म्हणाले, डेराप्रमुखाच्या दोन फोटोंमध्ये वेगवेगळ्या हेअरस्टाइलचा वाद दिसतोय. याचे कारण 16 ऑगस्टला त्याच्या फोटोमध्ये बाबाचा नैसर्गिक लूक दिसतोय, यात त्याने बारीक कटिंग केलेली आहे, तर 25 ऑगस्टच्या जारी झालेल्या फोटोमध्ये त्याच्या डोक्याचे आणि दाढीचे केस खूप वाढलेले दिसताहेत. बहुतेक यात त्याने विग वापरली असेल.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राम रहीमच्या वाढलेल्या आणि कमी झालेल्या दाढीचे फोटोज...

Next Article

Recommended