आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अडचण\' होती नवऱ्याची, बॉयफ्रेंड म्हणाला, त्याला संपवलेय मी; पण पत्नीने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - प्रेयसीच्या नवऱ्याचा खून करणाऱ्या प्रियकराला शुक्रवारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोघांच्या अवैध लैंगिक संबंधांची माहिती समजल्यावर नवऱ्याने तिला टोकणे सुरू केले होते. प्रेयसीच्या भेटीत कोणतीही आडकाठी येऊ नये म्हणून प्रियकराने तिच्या नवऱ्याचा काटा काढला. जी प्रेयसी मिळावी म्हणून त्याने खून केला, तिनेच प्रियकराविरुद्ध कोर्टात साक्ष दिली.
 
फोनवर सांगितले, तुझे कुंकू मी मिटवलेय
- आरोपी लोहरचाने विमलाला फोन करून सांगितले की, तुझा नवरा दारूच्या नशेत बेशुद्ध पडलाय. 
- पुढच्या दिवशी त्याने पुन्हा फोन करून विमलाला सांगितले की, गोकुळचा काटा काढलाय. आता आपल्या दोघांमध्येही कुणीच येणार नाही.
- घटनेचा बोभाटा झाल्यानंतर विमलाने लोहरचा याच्याविरुद्ध कोर्टात जबाब दिला.
- न्यायाधीश पंकज नरुका यांनी आरोपीला परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीवरून दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
- प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान 19 जणांनी साक्ष दिली.
 
विहिरीत टाकला होता मृतदेह
मोतीलाल रेगर यांनी एफआयआर दाखल केली की, त्यांचा भाऊ गोकुळ दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.
- गोकुळचा कुणीतरी खून करून सुनसान जागी असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह टाकला होता. प्रचंड दुर्गंधी आल्याने विहिरीतील मृतदेहाची माहिती मिळाली होती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये इन्फोग्राफिकच्या माध्यमातून वाचा, काय होती ही घटना?
बातम्या आणखी आहेत...