आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप करण्यासाठी दर आठवड्याला पकडायचा ट्रेन, नराधमाने दिली 600 बलात्कारांची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - नुकतेच बरेलीच्या एका 14 वर्षांच्या मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्याशीच लग्न करण्यासाठी मजबूर करण्यात आले. मुलीचे वडील गरीब होते आणि रेपमुळे जन्मलेल्या मुलाला सांभाळण्यास असमर्थ होते. गुन्हेगारांची विक्षिप्त मानसिकता चिमुकल्यांनाही सोडत नाही. याच वर्षीच्या जानेवारीत एका अशाच सिरियल रेपिस्टचा खुलासा झाला होता, ज्याने 600 हून अधिक चिमुरड्या मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवले होते. क्राइम सिरीजमध्ये divyamarathi.com अशा सिरियल रेपिस्टचा डिटेल पंचनामा देत आहे.
 
केस 13 डिसेंबर 2016 - सिरियल रेपिस्टने 600 मुलींना बनवले शिकार
 
स्टोरी
- 13 डिसेंबर 2016 चा दिवस. दिल्लीच्या न्यू अशोकनगरमध्ये एक 38 वर्षांचा माणूस दोन मुलींचा पाठलाग करतोय. तो मुलींसमोर मोबाइल काढून त्यांच्याच वडिलांशी बोलत असल्याचे नाटक करतो. यामुळे मुलींची खात्री पटते की हा आपल्या घरच्यांच्या ओळखीचा आहे. मुली त्याच्यासोबत चालायला लागतात. तो त्यांना एका पडक्या बिल्डिंगमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. पण मुलींना धोक्याची जाणीव होते अन् त्या ओरडायला लागतात. मग शेजारच्या काकूंसोबत घरी परत येतात.
- दोन्ही मुलींचे पालक या घटनेची तक्रार पोलिसांत करतात. 15 जानेवारीला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दिल्ली पोलिस या नराधमाला छेडछाडीच्या आरोपात अटक करतात. पोलिसांना वाटते की, एखादा क्षुल्लक रोडरोमिओच आहे, पण चौकशीत जे सत्य समोर येते, त्यामुळे पोलिसही हादरून जातात.
 
'मी 600 मुलींचा रेप केलाय'
-कोंडली गावातून अटक झालेल्या 38 वर्षीय सुनील रस्तोगी सांगतो की, मला 7 ते 11 वर्षांच्या मुली आवडतात. मला त्या व्हर्जिन असल्यामुळे त्यांची 'शिकार' करायला आवडते. आतापर्यंत 600 हून जास्त मुलींवर मी रेप केलेला आहे. जी जाळ्यात अडकली, ती गेली अन् जी आरडाओरड करते, तिला तिथेच सोडून शहर बदलतो.
- सुनील पुढे म्हणाला की, मला याचे काहीच वाटत नाही साहेब. 2004 पासून मी हे करतोय. आतापर्यंत मी अनेक मुलींना पकडले आणि त्यातील 85 टक्के मुलींवर बलात्कार केलाय.
- या रेपिस्टच्या मते, तो एका दिवसात 4 ते 5 मुलींना आपली 'शिकार' बनवायचा.
 
मुलींची शिकार करायला दर आठवड्याला दिल्ली गाठायचा
- 600 मुलींवरील बलात्काराचा दोषी सुनील रस्तोगी यूपीच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचा रहिवासी आहे.
- पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो रामपूरपासून गाजियाबाद, नोएडा, उत्तराखंड आणि ईस्ट दिल्लीतील मुलींना आपली शिकार बनवले. तो जवळजवळ दर आठवड्याला ट्रेनने दिल्लीला यायचा.
 
बलात्कारी सुनीलचे कुटुंब
- बिलासपूरच्या सुनील रस्तोगीने उत्तराखंडच्या भावनाशी 1999 मध्ये लग्न केले होते.
- चिमुकल्या मुलींची शिकार करणाऱ्या या सैतानाला 3 मुले आणि 2 मुली आहेत.
- भावनाला माहिती होते की तिचा नवरा एक राक्षस आहे. तिने पोलिसांनाच त्याला ठार मारण्याची विनवणी केली अन् त्याच्या जुलमाची कर्मकथा कथन केली...
 
प्रकरणातील सध्याच्या घडामोडी
- ईस्ट दिल्लीचे डीसीपी ओमवीर बिष्णोईंनी सांगितले की सुनील सध्या जेलमध्ये आहे आणि तो बाहेर येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. पत्नी भावना म्हणते की, मला त्याला फासावर लटकलेला पाहायचेय. मी त्याच्यामुळेच रांगत रांगत चालते. बरे झाले अटक झाली. तसाही घरच्यासाठी काहीच करत नव्हता.
पुढच्या इन्फोग्राफिक्समध्ये वाचा, सिरियल रेपिस्टच्या पत्नीने सांगितलेली त्याच्या सैतानी विकृतीची कहाणी...
बातम्या आणखी आहेत...