आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी \'डबल मेहनत\' घ्यायचा कोचिंग क्लासवाला, मुले निघून गेल्यावर व्हायचे हे काम!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पकडण्यात आलेल्या तरुणीसह 2 महिला. - Divya Marathi
पकडण्यात आलेल्या तरुणीसह 2 महिला.
रायगड - दिवसा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विद्यार्थी ट्यूशन घ्यायचे. यानंतर याच कोचिंग क्लासमध्ये 'गिऱ्हाईक' ये-जा करायचे आणि तरुणींचे दामही ठरायचे. पोलिसांना कळल्यावर त्यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून कोचिंग क्लासमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत तरुणींना 2 तरुणांसह रंगेहाथ पकडले. येथून सेक्सची औषधी आणि आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले.
 
कृषी अधिकारी चालवायचा येथे देहव्यापार
- पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, जूट मिलजवळील सावित्रनगरमध्ये कोचिंग सेंटरच्या आडून सेक्स रॅकेट सुरू आहे.
- विशेष म्हणजे हे रॅकेट चालवणारा माणूस कृषी विभागात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे.
- पोलिसांनी मग बोगस ग्राहक तयार करून तेथे पाठवले. तरुणीला देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये एका 500च्या नोटेवर पेन्सिलने सिग्नेचरही केले.
- इकडे बोगस ग्राहकाने संध्याकाळी कोचिंगमध्ये जाऊन सौदा ठरवला. त्या वेळी एक तरुण एका तरुणीसह आक्षेपार्ह अवस्थेत होता.
- इकडे पोलिसांना इशारा मिळताच धाड टाकण्यात आली आणि घटनास्थळावरून संचालक, तरुण आणि तरुणीसहित 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले.
- येथून पोलिसांना आक्षेपार्ह सामग्री आणि अनेक सेक्स औषधे मिळाली.
- पकडण्यात आलेल्या 2 महिलांना शहरातीलच असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे तरुणीला घरघोडा क्षेत्रातील राहणारी असल्याचे सांगितले जात आहे. दुसरा तरुण शहरातीलच असल्याचे कळते.
 
पालकांना कळल्यावर झाले अवाक्
- जेव्हा विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती मिळाली की, मुले शिकायला जातात तेथे चक्क सेक्स रॅकेट सुरू आहे तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
- हा कोचिंग क्लास 1 महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आला होता आणि येथे पीईटीची ट्यूशन दिली जात होती.
- यात अंदाजे 20 विद्यार्थ्यांनी अॅडमिशन घेतलेले होते.
 
असा झाला रॅकेटचा खुलासा
- सावित्रनगराच्या खोली क्रमांक सी-27 मध्ये सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वकाही सामान्य होते.
- दुपारी 1 वाजेनंतर मात्र बदल होत होता. रोज कारमधून नवनवीन तरुणी आणि महिला येथे यायच्या.
- संचालक त्यांना आपल्या कारमध्ये बसवून आणायचा. मग ग्राहकही तेथे पोहोचायचे.
- घराबाहेर व मागे आक्षेपार्ह वस्तूंसोबत, दारू-बिअरच्या बाटल्याही पडलेल्या होत्या.
- संशय आल्यावर गल्लीतल्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली होती.
फोटो: जगदीश पटेल
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...