आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या आक्रोशाने सगळे हेलावले, लग्नाला झाले होते फक्त 3 महिने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 सप्टेंबरला दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवान अजय सिंह शहीद झाले. - Divya Marathi
7 सप्टेंबरला दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवान अजय सिंह शहीद झाले.
रायबरेली - 7 सप्टेंबर रोजी रात्री जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत यूपीच्या रायबरेलीचे अजयपाल सिंह शहीद झाले. शनिवारी सकाळी शहीद अजयपाल सिंह यांचे पार्थिव शरीर त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले होते. अजिय सिंह यांचे वडील रामसिंह म्हणाले की, जेव्हा सीएम योगी येतील तेव्हाच मुलावर अंत्यसंस्कार केले जातील. गावकऱ्यांनी याच मागणीवरून अलाहाबाद- लखनऊ हायवे जाम केला होता. तथापि, प्रशासनाने समजावल्यानंतर ते तयार झाले.
 
अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी...
- राजपुताना रेजिमेंटचे बहादूर अजयपाल सिंह ऊर्फ कुलदीप सिंह गुरुवारी दशहतवाद्यांशी मुकाबला करताना शहीद झाले होते.
- शनिवारी सकाळी 8.30 वाजता त्यांचा मृतदेह सेनेच्या जवानांनी रुग्णवाहिकेतून गावात आणला. तेव्हा अंत्यदर्शनासाठी हजारोंची गर्दी जमली होती.
- शहीद जवान अजयपाल सिंह चार भावांत सर्वात लहान होते.
- ते 2012 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. देशसेवेसाठी सैन्यात जाण्याचे त्यांचे लहानपणापासूनच स्वप्न होते.
 
3 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
- शहीद अजयपाल सिंह यांचे लग्न  12 जून 2017 रोजी लता सिंह यांच्याशी झाले होते. पत्नीचे रडून-रडून हाल झाले होते. अक्षरश: धायमोकलून ती आक्रोश करत होती.
- लग्नानंतर अजय ड्यूटीवर परत गेले, तर लता तिच्या माहेरात गेली होती. शुक्रवारी तिला सासरच्यांनी बोलावले. तिथे गेल्यावर तिला पती शहीद झाल्याची बातमी कळताच ती बेशुद्ध झाली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...