आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवराच आलाय समजून तिने उघडले दार, नराधमांनी रात्रभर बांधून केला गँगरेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी/ग्वाल्हेर - येथील ग्रामीण पोलिस हद्दीतील गौशालामध्ये राहणाऱ्या एका आदिवासी विवाहितेवर 3 तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला तिच्या घरातच बांधून ठेवून आळीपाळीने बलात्कार केला. घटनेच्या वेळी पीडिता घरी एकटी होती. पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींविरोधात एससीएसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौशालाची रहिवासी महिला 3 सप्टेंबर रोजी रात्री घरात एकटीच होती. तिचा नवरा मजुरीसाठी शहरातून बाहेर गेलेला होता. रात्री 12 वाजता आरोपी नरेश रावत, अर्पित शर्मा आणि सुनील यादव हे पीडितेच्या घरी पोहोचले. 
-त्यांनी घराचे दार ठोठावले असता, पीडितेला वाटले की, तिचा नवराच घरी आलेला आहे. तिने दरवाजा उघडला.
- तितक्यात तिन्ही आरोपींनी घरात प्रवेश करून पीडितेला दोरखंडाने बांधले आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली. 
- यानंतर आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी पळून गेले. सकाळी पीडितेचा पती घरी परत आल्यावर त्याला तिन्ही नराधमांच्या कुकृत्याची हकिगत पत्नीकडून समजली. यानंतर दोघेही पती-पत्नी पोलिसांत पोहोचले आणि त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
- पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्स इन्फोग्राफिकमधून वाचा, पीडितेवर गुदरलेला प्रसंग...
बातम्या आणखी आहेत...