आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक भाऊ रेप करत होता, 6 जण व्हिडिओ शूट करत होते; राजरोस फिरताहेत सर्व नराधम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छतरपूर/सागर - भगवा पोलिस स्टेशन हद्दीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या गुन्ह्यात 7 आरोपी आहेत, जे एकमेकांचे भाऊ आहेत. जेव्हा एक रेप करत होता, तेव्हा त्याचे 6 भाऊ बलात्काराचा व्हिडिओ बनवत होते. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
 
सतभैया नावाने कुख्यात आहेत आरोप...
- बलात्कार झाल्याचे पीडितेने स्वत: सांगितले. परंतु पोलिसांचे साटेलोटे असल्याने 5 दिवस झाले तरी पीडितेचे मेडिकल चेकअप करण्यात आलेले नाही.
- एवढेच नाही, अपहरणकर्ते आरोपी राजरोस खुलेआम फिरत आहेत. पोलिसांनी गुन्हा क्रमांक 192/17 नोंदवून कलम 363, 366 ए अंतर्गत प्रकरण दाखल केले आहे.
 
पोलिसांत केली तक्रार
- पीडितेच्या आईने सांगितले की, आम्ही सर्व मजुरी करून घर चालवतो.
- त्या म्हणाल्या, अपहरण झाल्यानंतर प्रकरणाची तक्रार घुवारा पोलिस चौकीत केली.
 
पीडितेचे वडील म्हणाले- सतभैया नावाने चर्चित आहेत आरोपी
- पीडितेच्या वडिलांनी एसपींना अर्ज देऊन सांगितले की, आरोपी 7 भाऊ आहेत. पूर्ण परिसरात सतभैय्या नावाने कुख्यात आहेत.
- हे सतभैया सातत्याने धमक्या देत आहेत. यामुळे माझे कुटुंब दहशतीखाली आले आहे.
- पोलिस आरोपींविरुद्ध काहीच कारवाई करत नाहीयेत. ते म्हणाले की, मंदिरात माझ्या अल्पवयीन मुलीला जयमाला घालण्यात आली.
- अर्जानुसार 27 सप्टेंबर 2017 रोजी अल्पवयीन मुलीचे आरोपींनी अपहरण केले आणि नंतर बलात्कार केला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमध्ये पूर्ण घटनाक्रम...  व्हिडिओ बनवून केला व्हायरल
बातम्या आणखी आहेत...