अंबाला - दीर-भावजयीच्या प्रेमसंबंधांमुळे जन्मलेले मूल रोडच्या कडेला सोडणाऱ्या आईला कोर्टातून जामीन मिळाला आहे. महिलेने सांगितले की, पतीचे 2011 मध्ये निधन झाल्यानंतर तिचे दिराशी अवैध लैंगिक संबंध झाले होते. बदनामीच्या भीतीमुळे मी मजबुरीने नवजात बाळाला रोडच्या कडेला सोडले.
- बाळ सापडले-बाळ सापडले असा सगळीकडेच बोभाटा झाला. शोध घेतल्यावर सीसीटीव्हीतून सत्य समोर आले. महिलेने हे पाऊल का उचलले हे जाणून घेण्यासाठी भास्कर टीमने तिची भेट घेतली. तेव्हा एका आईची, समाजाच्या भीतीची आणि ममतेची हृदयद्रावक कहाणी समोर आली.
-भास्कर टीमने तिला चिमुकल्याचा फोटो दाखवताच ती ढसढसा रडायला लागली. लगेच म्हणाली- माझी चूक झाली, माफ करा, पण मला माझे बाळ परत द्या!
असे आहे पूर्ण प्रकरण...
- मंगळवारी भास्कर टीम महिलेशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेली. महिलेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
- रोडच्या कडेला बाकावर सोडलेली तिचे पाचवे अपत्य आहे. तिच्या दोन मुलींची लग्नेही झाली आहेत. विचारल्यावर म्हणाली, 13 सप्टेंबरच्या सकाळी मी मुलाला जन्म दिला. त्या वेळी घरात मी आणि माझी लहान मुलगीच होतो.
- चिमुकल्याच्या जन्मानंतर तासाभरानेच ती छोट्या मुलीसह त्याला टाकून द्यायला आली. प्रसूतीसाठी कुणालाच बोलावलेले नव्हते.
- समाजात बदनामीच्या भीतीने तिने हे पाऊल उचलले, परंतु आता तिला पश्चात्ताप होत आहे. तिला ते मूल परत पाहिजे असल्याचे म्हणते.
- रुग्णालयात दाखल असलेल्या नवजात बालकावर उपचार सुरू आहेत. त्याला पाहायला येणाऱ्या नातेवाइकांना भेटायला मनाई केली जात आहे.
राजूची होणार डीएनए टेस्ट
- पोलिस चौकशीत महिलेने अनेक कहाण्या ऐकवल्या. कधी भाड्याने गर्भाशय दिल्याचे म्हणाली, तर कधी इतरांवर आरोप ठेवले.
- पण शेवटी तिने दिराचे नाव घेतले. पोलिस तिचा दीर राजूची डीएनए टेस्ट करून सॅम्पल घेणार आहे.
दिराच्या म्हणण्यावरून रोडच्या कडेला सोडले बाळ
- 35 वर्षीय महिलेने 13 सप्टेंबरला सकाळी मुलाला जन्म दिला. तिच्या पतीचे नोव्हेंबर 2011 मध्येच आजारपणात निधन झाले होते. यानंतर तिचे दिराशी अवैध लैंगिक संबंध प्रस्थापित झाले.
- ती वाढलेल्या पोटाबद्दल इतरांना काहीतरी आजार असल्याचा बहाणा करून दिवस काढत होती. जेव्हा 13 तारखेला नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा दिराच्या म्हणण्यावरून ती त्याला रस्त्याच्या कडेला सोडून निघून आली.
- हा खुलासा महिलेने पोलिस चौकशीत केला आहे. याबद्दल पोलिसांनी महिलेचा दीर राजूला आरोपी केले असून तो फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अॅफिडेव्हिट देऊन आई घेऊ शकत एकतर्फी निर्णय
- डीएनए रिपोर्ट आल्यानंतर नवजात बालकाची आई निर्णय घेऊ शकते. यासाठी शिशू निकेतन टीम आईकडून कोर्टात एक 200 रुपयांचे शपथपत्र घेते की तिला नवजात बालकाला सांभाळण्याची इच्छा नाही.
- पुढची सर्व जबाबदारी विभागाची असेल. यानंतर विभाग नवजात बालकाला एखाद्या सुयोग्य पालकाला दत्तक देऊ शकते.
थेट प्रश्न
बलबीर सिंह, इंचार्ज
Q. महिलेला मुलगा कुणापासून झाला, हे सर्व राजीखुशीने झाले?
- महिलेचे दिराशी संबंध होते. दोघांच्या राजीखुशीनेच हे सर्व सुरू होते.
Q. गर्भ पाडण्यासाठीही काही केले होते का?
- एक-दोनदा औषधे खाल्ली होती, तरीही गर्भ पडला नाही.
Q. महिलेने दिरावर लावलेले आरोप योग्य आहेत का, तो कुठे राहतो?
- दिराच्या डीएनए टेस्टसाठी सॅम्पल घेण्यात येईल. सध्या तो फरार आहे, तो महिलेच्या घराच्या आसपासच राहतो.
Q. नवजात बालकाला रोडच्या कडेला सोडण्यात दिराची काय भूमिका आहे, त्याच्यावर कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई होईल?
- त्याच्या म्हणण्यावरूनच महिलेने बालकाला रोडच्या कडेला सोडले होते. दिराला भादंवि कलम 120 बी अंतर्गत आरोपी केले आहे.
Q. हे बालक महिलेला पुन्हा मिळू शकते काय?
- आता हे काम सीडब्ल्यूसी वा अॅडॉप्शन कमिटीचे आहे, कायदेशीर प्रक्रियेनंतर ते काय निर्णय घेतील यावरच सर्व अवलंबून आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी रिलेटेड आणखी फोटोज...