आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरावर नाराज झाली भावजयी, जीव वाचवणाऱ्या तरुणीला सांगितले हे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - शनिवारी सकाळी एक तरुणीच्या समजूतदारपणामुळे एका महिलेचा जीव वाचला. महिला आत्महत्या करायला रेल्वे रुळावर जात होती. एवढ्यात ऑफिसमध्ये जाणाऱ्या एका तरुणीची नजर महिलेवर गेली. तिने धावत जाऊन तिला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्या दिराशी भांडण झाले होते. यामुळेच ती अहमदपूर रेल्वे फाटकापर्यंत गेली होती. यानंतर तरुणीने महिला पथकाला फोन करून माहिती दिली. तिच्या नवऱ्यालाही फोनवरून कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेचे समुपदेशन करून तिला तिच्या नवऱ्याच्या हवाली केले आहे.
 
असे आहे प्रकरण...
- महिलेला वाचवणाऱ्या सुप्रियाने तिला हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण विचारले. खूप वेळ महिलेचे समुपदेशन केल्याने तिचा राग शांत झाला होता. यानंतर तिने आत्महत्येचा विचार सोडून दिला आणि कारण सांगितले.
 
दिराने फोन सोडायला लावला म्हणून होती नाराज...
- पोलिसांना फोन लावल्यानंतर सुप्रियाने महिलेच्या दिराशी संपर्क साधला, पण सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या पतीलाच फोन केला.
- ते ताबडतोब तिथे आले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची पत्नी जरा-जराशा गोष्टी चिडते. 
- सकाळी ती लहान भावाच्या फोनवरून बोलत होती. त्याला कामावर जायचे होते. त्याने मोबाइल फोन घेतला. एवढ्यावरूनच ती चिडून येथपर्यंत आली.
- यानंतर पोलिसांनी दोघांना समज देऊन घरी पाठवले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक्समध्ये का महिला पोहोचली आत्महत्या करायला...
बातम्या आणखी आहेत...