आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने जन्मदात्या बापाला घरातच गाडले, कुत्र्यांनी खोदल्यावर झाला हा शॉकिंग खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटिंडा - बाप हा बापच असतो. मुलांच्या गरजा पूर्ण करता करता स्वत:चे पूर्ण आयुष्य पणाला लावत असतो. मुलेही मग सुचेल तसे आपल्या जिवलग आईबाबांसाठी काही ना काही करत असतात. पण परिस्थितीपुढे कधी कुणाचे चाललंय का? असेच एक प्रकरण येथे घडले.
-वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने अल्पवयीन मुलाने चक्क राहत्या घरातच वडिलांचा मृतदेह पुरला. बापलेक 2-3 वर्षांपासून या किरायाच्या घरात राहत होते. सकाळी घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने घटनेला वाचा फुटली. या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांनी तिकडे पाहिले तर कुत्रेही सारखे घराभोवती फिरत होते. मग लोकांनी घरात जाऊन पाहिले तोपर्यंत कुत्र्यांनी मृतदेहाला जमिनीतून अर्धे बाहेरही काढले होते. 
 
गंभीर आजाराने होते ग्रस्त...
- मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुरजितसिंग (60) अगोदर होमगार्ड म्हणून तैनात होता. ते त्यांचा मुलगा मोहनसह या घरात किरायाने राहत होते. होमगार्डची नोकरी सोडल्यावर एक खासगी नोकरी करून ते घर चालवत होते. सुरजित हे दीर्घ काळापासून गंभीर आजाराने ग्रस्त होते.
- त्यांचा एक आठवड्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, मुलाने पोलिसांना सांगितलेली हकिगत...
बातम्या आणखी आहेत...