आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9वीतला मुलगा शिक्षिकेला म्हणाला- तुझ्याशिवाय राहू शकत नाही, दुसऱ्याचीही होऊ देणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - येथे खासगी शाळेत एका नववीच्या विद्यार्थ्याचे घाणेरडे कृत्य समोर आले आहे. 15 वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतीलच एका मॅडमवर क्रश होते. मुलाने यामुळे सातत्याने मॅडमच्या मोबाइलवर मेसेज पाठवणे सुरू केले. मॅडमनी पहिल्यांदा त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु हे जेव्हा थांबले नाही, तेव्हा त्यांनी हेल्पलाइनचा आधार घेतला. 

 

विद्यार्थी ऐकायला तयार नाही...
- मॅडमच्या मते, त्या  त्रस्त होऊन हेल्पलाइनकडे शनिवारी गेल्या. येथे विद्यार्थ्याला बोलावण्यात आले, तेथे त्याने चूक समजून घेण्याऐवजी माझे किती प्रेम आहे हेच सांगत राहिला. महिला हेल्पलाइनही याबाबत संभ्रमात पडले आहे. अविवाहित शिक्षिकेने म्हटले की, मी त्या मुलाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नाही. एका आठवड्यापूर्वी मॅडमनी हेल्पलाइनमध्ये धाव घेतली. येथे दोघांना बोलावण्यात आले. हेल्पलाइनने बोलावण्यावर सर्वात आधी शिक्षिका तेथे गेल्या. शिक्षिकेने आपल्या मोबाइलवरील मुलाकडून आलेले सर्व मेसेज आणि फोटोज दाखवले. वर्षभरापासून त्रस्त शिक्षिकेने येथे सर्व कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या की, अगोदर त्यांनी मुलाची नादानी समजून दुर्लक्ष केले, पण सातत्याने मेसेज येऊ लागले.

 

हेल्पलाइनमध्ये विद्यार्थी म्हणाला- मी कोणताही गुन्हा नाही केला...
- मॅडमची पूर्ण कहाणी ऐकल्यानंतर मुलाला बोलावण्यात आले, तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून समुपदेशकही चकित झाले. त्याने उत्तर दिले की, मी काय गुन्हा केलाय? मग त्याला समजावले तर शिक्षिकेकडे इशारा करून म्हणाला- इतरांशी तुमचे भाऊबहिणीचे नाते असू शकते, माझ्याशी नाही. शेवटी मुलाच्या मोठ्या मामाकडून लिहून घेण्यात आले की, विद्यार्थ्याला सुधारण्यासाठी ते डॉक्टरांना दाखवतील आणि घरातही समज देतील.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून पूर्ण प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...