आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे लव्ह स्टोरी; प्रेयसीला मिळाला जामीन, तिला भेटण्यासाठी प्रियकरही जेलमधून पळाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपूरथळा/जालंधर - सुनैना मर्डर केसमध्ये 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला पंकजसिंह संधू ऊर्फ भीमा सिव्हिल हॉस्पिटल कपूरथळाहून दुपारी 2 वाजता फरार झाला. जालंधरमधील आबादपुरात प्रेयसीला भेटायला गेलेल्या भीमाला पोलिसांनी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा अटक केली. भीमा त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी पंजाबातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. एसीपी कैलासचंद्र म्हणाले की, फरार झालेल्या कैदी भीमाबाबत राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला होता.
 
पोलिसानेच पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप
- भीमा सतनामनगरमध्ये राहायचा, त्यामुळे फरार झाल्यानंतर तो तेथेच जाईल याचा पोलिसांना संशय होता.
- एसीपी म्हणाले, एसएचओ जीवन सिंह यांना माहिती मिळाली होती की, भीमाला आबादपुरात पाहण्यात आले आहे. मग पोलिसांनी छापा टाकून अखेर त्याला जेरबंद केले.
- ही घटना बुधवारी दुपारी 1.45 वाजता घडली. जेलमधून मेडिकल चेकअपसाठी सरकारी रुग्णालयात आलेल्या कैद्याला त्याच्यासोबत असलेल्या पोलिसानेच संधी पाहून पळून जाऊ दिले.
- ही घटना सरकारी रुग्णालयाच्या कॅंटीनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
- पोलिसांनी कैद्याला पळून जाण्याचा इशारा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, का पळाला होता कैदी आणि त्याची लव्ह स्टोरी...
बातम्या आणखी आहेत...