आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर एकमेकांना देता येत नव्हता वेळ, मग जवानाने पत्नीच्या मर्जीने उचलले हे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत जवान अाकाश सिंह व त्यांची पत्नी निकिता सिंह. - Divya Marathi
मृत जवान अाकाश सिंह व त्यांची पत्नी निकिता सिंह.
जांजगीर - पत्नीला वेळ देऊ शकत नसल्याने एका जवानाने मन सुन्न करणारा मार्ग निवडला. त्याने जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. तेही एकट्याने नव्हे तर पत्नीसह. 21 वर्षांच्या या जवानाचे फक्त 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. जवानाने मृत्यूपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवलीये. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 
असे आहे प्रकरण
- आकाश सिंहचे 3 महिन्यांपूर्वीच निकिता सिंहशी लग्न झाले. दोघेही नुकतेच एकमेकांना समजू-उमजू लागले होते. लग्नामुळे घरातही अगदी आनंदी वातावरण होते.
- लग्नानंतर पुन्हा एकदा जवान रक्षाबंधनच्या सुटीवर घरी आला होता. मग त्याने हे कठोर पाऊल उचलले. आदल्या रात्री त्याची पत्नीशी काही कुरबुर झाली. मग दोघांनी जेवण केले आणि झोपायला गेले. रात्री उशिरा त्याने पत्नी निकिताचा गळा दाबला आणि स्वत: कारमधून 30 किमी अंतरावरील रेल्वेस्टेशनवर गेला. 
- येथे गाडी उभी करून तो सरळ रेल्वे ट्रॅकवर गेला आणि समोरून येणाऱ्या मालगाडीसमोर त्याने आपली मान ठेवली. सकाळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवला. इकडे घरात बेडरूममध्ये सुनेचा मृतदेह पाहून घरातल्यांनी आकांत सुरू केला होता.  पोलिस पोहोचले आणि आकाशचा शोध सुरू झाला. त्यांना माहिती मिळाली की आकाशनेही रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.
 
तीन दिवसांपूर्वीच माहेरातून आली होती पत्नी
- घटनेच्या तीन दिवसआधीच मृत पत्नी आपल्या माहेरातून आली होती. तिचे काका म्हणतात, हे पूर्ण प्रकरणच संशयास्पद वाटत आहे. माझी पुतणी असे पाऊल कधीच उचलणार नाही. तिची हत्या करण्यात आलेली आहे. याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...