आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या आश्रमात अलमारीला गुप्त दरवाजा, रस्ता जायचा बलात्कारी बाबाच्या गुहेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा - साध्वी बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची कैद झाल्यानंतर गुरमित राम रहीमवर दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता झालेला नवा खुलासा डेऱ्यात बनलेल्या गर्ल्स कॉलेज आणि शाळेशी संबंधित आहे. बलात्कारी बाबाने चलाखीने त्यांना जुन्या डेऱ्यातून उचलून आपल्या नव्या डेऱ्यामध्ये शिफ्ट केले. शाळेची तर एनओसी मिळाली होती, परंतु कॉलेज मात्र विना एनओसीचेच शिफ्ट करण्यात आले होते. याच आश्रमात (होस्टेल) मुली शिकत होत्या. समाजकल्याणचे पथक येथे पोहोचताच एक गुप्त दरवाजा आढळला जो सरळ बाबाच्या गुहेत जात होता.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
 - सिरसामध्ये डेरा सच्चा सौदाचे दोन डेरे (आश्रम) आहेत. एक शहराजवळ जुना डेरा आहे, आणि त्यापासून थोड्या अंतरावर नवी डेरा आहे.
 - जुन्या डेऱ्यामध्ये एक गर्ल्स स्कूल आणि गर्ल्स कॉलेज सुरू होते, तर नव्या डेऱ्यामध्ये मुलांचे स्कूल आणि कॉलेज होते. राम रहीम हा स्वत: नव्या डेऱ्यात राहायचा.
 - त्याने मुलींना आपल्या डेऱ्यात शिफ्ट करण्यासाठी गर्ल्स स्कूल आणि कॉलेजला येथे हलवले होते. तर मुलांच्या दोन्ही शाळा आणि कॉलेजला जुन्या डेऱ्यात शिफ्ट केले होते.
 
 एकाची एनओसी घेतली, परंतु दुसऱ्याचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे...
 - डेरा प्रशासनाने गर्ल्स कॉलेज आणि शाळेला शिफ्ट करण्यासाठी सरकारला पत्र पाठवले आणि एनओसीची मागणी केली.
 - सू्त्रांनुसार, सरकारने गर्ल्स स्कूलच्या स्थलांतराला विभागाच्या माध्यमातून गुपचूप एनओसी जारी केली, परंतु कॉलेजची एनओसी अजून उच्चशिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे.
 - यानंतरही गर्ल्स कॉलेजला शिफ्ट करण्यात आले. सरकारी विभागाने यावर कोणतीही अॅक्शन घेतली नव्हती.
 
 पुढच्या स्लाइड्सवर पाहा, शाही आश्रमात आढळला गुप्त दरवाजा...
बातम्या आणखी आहेत...